शेताच्या बांधावर गळफास घेवून केली आत्महत्या

जळगाव तालुक्यातील घटना
शेताच्या बांधावर  गळफास घेवून केली आत्महत्या

जळगाव - Jalgaon

तालुक्यातील तिघ्रे शिवारात शेताच्या बांधावर रस्त्याच्या कामासाठी आलेल्या परप्रांतिय मजूराने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नेमक्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

अधिक माहिती अशी की, संतोष रॉय भिम रॉय (वय-२३) रा. दोंदिया पो. अम्बा जरूवाडीह जि. जरमुण्डी दुमका झारखंड ह.मु. तिघ्रे ता.जि.जळगाव हा तरूण गेल्या तीन महिन्यांपासून जळगाव खुर्द व तिघ्रे शिवारातील रस्त्याच्या सुरु असलेल्या कामावर मजुर म्हणुन काम करत होता. काल रविवारी सोबत काम करणार्‍या मजूरांसह त्याने रात्री जेवण केले व सर्व झोपून गेले. दरम्यान आज सोमवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास तिघ्रे शिवारातील शेनफडू पुंडलिक पाटील यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला संतोष रॉय याने रूमालाच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसुन आले.

इतर बांधकाम मजुरांनी तातडीने त्याला डॉ उल्हास पाटील रूग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संतोष राय याने आत्महत्या का केली त्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रविंद्र इंधाटे करीत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com