तळेले कॉलनीत युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
आत्महत्या
आत्महत्या

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

शहरातील तळेले कॉलनीत राहणार्‍या 19 वर्षीय युवतीने घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री 8.10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शनीपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील तळेले कॉलनीतील कोमल सुनिल भालेराव ही आई वडील व लहान भावासोबत वास्तव्यास आहेत. आईच्या डोळ्यांचे ऑपरेशन असल्याने तिचे आई वडील दोघे जण दोन दिवसापूर्वी मुंबई येथे गेले होते.

गुरुवारी रात्रीच्या सुुुमारास ते घरी परतणार होते. तसेच कोमलचा भाऊ हा जीमला गेला असल्याने कोमल ही एकटीच घरात होती. घरात कोणीच नसल्याने कोमलने घराचा दरवाजा आतून बंद करीत साडीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात किरण यादव तळेले यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास प्र्रमोद पाटील हे करीत आहे.

घटनेची माहिती पोलिसांना कळताच शनीपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद सपकाळे व पोलिस कॉनस्टेबल प्रमोद पाटील यांनी घटनास्थळी जावून पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला.

खिडकीतून बघताच दिसला बहिणीचा मृतदेह

कोमलचा भाऊ सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास जीमवरुन घरी आला असता, त्याला घराचा दरवाजा आतून बंद असलेला दिसून आला. त्याने खिडकीतून डोकावून बघितले असता त्याला आपल्या बहिणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याने हा प्रकार बघताच आरडाओरड सुरु केल्याने परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com