तरुणीची गळफास घेवून आत्महत्या
जळगाव

तरुणीची गळफास घेवून आत्महत्या

दादावाडी परिसरातील घटना

Ramsing Pardeshi

जळगाव | प्रतिनिधी Jalgaon

दादावाडी परिसरामधील कृष्णपूरम भागातील एका तरुणीने २८ रोजी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना लक्षात येताच तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, तिचा मृत्यू झालेला असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी जाहीर केले.

दादावाडी परिसरामधील वीज पुरवठा २८ रोजी रात्री खंडित झाला होता. या वेळी सायली बाळासाहेब पाटील (वय २१) आणि तिची आई घरात होत्या. तरुणीचे वडील बाळासाहेब पाटील आणि भाऊ विश्‍वेस पाटील हे दोघं मेडिकल दुकानावर होते. वीज पुरवठा खंडित झाल्याने सायलीची आई घराबाहेर निघाल्या आणि त्या शेजारील महिलांशी गप्पा करीत होत्या. याच वेळी सायली हिने बेडरुममध्ये गळफास घेतला. काही वेळाने सायलीच्या आई घरात आल्या आणि सायलीने गळफास घेतल्याचे लक्षात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले असता सायली हिचा मृत्यू झालेला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

याबाबत डॉ.सचिन अहिरे यांनी खबर दिली. त्यावरुन तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तपास नाईक प्रफुल्ल धांडे करीत आहेत. दरम्यान, सायली हिला ‘ऍथलेटिक्स’चा क्लास लावायचा होता. पण, सध्या कोरोनाचा कालावधी असल्याने तिला काही कालावधी थांब, असे पालकांनी सांगितले होते. या कारणावरुन सायली नाराज होती, असे सांगण्यात येते.

Deshdoot
www.deshdoot.com