तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

चाळीसगाव (chalisgaon) प्रतिनिधी-

शहरातील जय बाबाची चौकात २२ वर्षीय तरूणाने आपल्या राहत्या घरात दोरीच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या (Suicide) केली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील जय बाबाजी चौक येथील महेश विजयसिंह राजपूत (वय २२) या तरूणाने आपल्या राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच वार्डातील नगरसेवक प्रदिप सत्यवान राजपूत यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली.

तेव्हा महेश याचा मृतदेह दोरीने लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी घडलेल्या घटनेबाबत चाळीसगाव शहर पोलिसात कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. नगरसेवक प्रदिप राजपूत यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Related Stories

No stories found.