<p><strong>जळगाव - Jalgaon</strong></p><p>कोरोनाच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंगल कार्यालयावर छापे टाकून कारवाईचा इशारा दिला होता. आज रविवार असतानांही जिल्हाधिकारी राऊत हे कारवाईसाठी रस्त्यावर उतरले.</p>.<p>महापालिका, तसेच विविध पोलीस ठाण्यांचा बंदोबस्त घेत जिल्हाधिकारी राऊत यांनी यशलॉन, दापोरेकर मंगल कार्यालय तसेच एमआयडीसीतील कमल पॅराडाईज हॉटेलची तपासणी केली. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान पोलीस बंदोबस्तातील खुद्द जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे.</p>