जळगाव : कुसुंबा येथील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या
जळगाव

जळगाव : कुसुंबा येथील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद

Rajendra Patil

जळगाव | प्रतिनिधी Jalgaon

तालुक्यातील कुसुंबा येथील एका तरुणाने रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.

कुसुंबा येथील आंबेडकरनगरातील महादेव पंडित शिरसाठ (वय ४०) याने घरात कोणी नसताना गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांची पत्नी घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले असता त्याचा मृत्यू झालेला असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी जाहीर केले.

याबाबत वैद्यकीय अधिकार्‍यांनी खबर दिली. त्यावरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. तपास हेड कॉन्स्टेबल डी.डी.खैरनार करीत आहेत. महादेव शिरसाठ हा एमआयडीसीमधील एका कंपनीत कामाला होता. त्याच्या पश्‍चात पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे. दरम्यान, ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचे सांगण्यात येते.

Deshdoot
www.deshdoot.com