परप्रांतीयावर पार पडली गुंतागुंतीची म्युकरमायकोसिसची शस्त्रक्रिया

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चौथी शस्त्रक्रिया यशस्वी; 19 डॉक्टरांच्या टीमने केली शस्त्रक्रिया
परप्रांतीयावर पार पडली गुंतागुंतीची म्युकरमायकोसिसची शस्त्रक्रिया

जळगाव Jalgaon - प्रतिनिधी :

गेल्या आठ दिवसांपासून दाखल असलेल्या परप्रांतीय प्रौढाला म्युकरमायकोसिसची लागण झाल्याचे निदान झाले. परंतु त्याची तीव्रता वाढत असल्याने वैद्यकीय पथकाने त्या प्रौढावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

कोरोना सदृश आजार व त्यात म्युकोरमायकोसिस झाल्यामुळे रुग्णाचा परिवार चिंतीत झाला होता. मात्र त्यांना धीर देत, संबंधित रुग्णाचा शस्त्रक्रियेद्वारे जीव वाचविला आहे. हा रुग्ण परराज्यातला होता. मात्र त्याला आपल्या रुग्णालयाकडून मोठ्या आशा होत्या. शक्य ते सर्व प्रयत्न आपण केले आहे. शासकीय महाविद्यालय व रुग्णालय आता अद्ययावत झाले असून रुग्णांना दिलासा देण्याचे कार्य करीत आहे.

डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

मंगळवारी या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यात रुग्णाच्या वरचा दोन्ही बाजूच्या जबडा, टाळू आणी वरचे दातांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. डोळा व मेंदूकडे पसरण्याआधीच ही गुंतागूंतीची शस्त्रक्रिया वेळेत झाल्यामुळे त्याचे दोन्ही अवयव वाचविण्यात डॉक्टरांना यश आहे. ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील चौथी यशस्वी शस्त्रक्रिया असल्याने डॉक्टरांकडून समाधान व्यक्त केले जात होते.

मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह़यातील धवळी या गावात राहणारे 50 वर्षीय इसम 30 मे रोजी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल झाले. त्यांना कोरोना सदृश व बुरशीच्या म्युकोरमायकोसिस आजाराची देखील लागण झाली होती.

परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून उपचार घ्यायचे होते. मात्र ते परराज्यातील असल्यामुळे योजनेत समाविष्ट करण्यास अडथळा येत होता. त्यासाठी अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेचे नोडल अधिकारी डॉ.आलोक यादव यांनी शर्थीचे प्रयत्न करून त्या रुग्णाला प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत समाविष्ट केले. त्यानंतर शस्त्रक्रिया हि विनामूल्य करून त्याला योजनेचा लाभ देण्यात आला.

म्युकोरमायकोसिसचे निदान करण्यासाठी वैद्यकीय पथकाने सूक्ष्मजीवशास्त्र विभागात नमुने पाठविले. याठिकाणी अत्याधुनिक मायक्रोस्कोपीद्वारे विभाग प्रमुख डॉ. किशोर इंगोले यांनी रोगाचे निदान केले.

19 जणांच्या टिमने केली शस्त्रक्रिया

औषधवैद्यक शास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. विजय गायकवाड, डॉ.आस्था गणेरीवाल यांच्या निगराणीखाली कक्ष क्रमांक सी 2 मध्ये ठेवण्यात आले होते मात्र शस्त्रक्रियेची गरज होती. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, म्युकोरमायकोसिस कृती दलाचे अध्यक्ष तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांनी 8 विभागातील प्रत्येकी दोन डॉक्टरांची मिळून शस्त्रक्रियेसाठी 19 जणांची टीम बनवली. मंगळवारी सकाळी 9.30 वाजता या रुग्णाची शस्त्रक्रिया होवून सुमारे साडेचार तासानंतर रुग्णास डॉक्टरांच्या निगरानीखाली ठेवण्यात आले आहे.

डॉक्टरांच्या याटिमने केली यशस्वी शस्त्रक्रिया

शस्त्रक्रियेत कान नाक घसा विभागाचे डॉ. अक्षय सरोदे, दंतशल्यचिकित्सा विभागाचे डॉ. इम्रान पठाण, डॉ. श्रुती शंखपाळ, शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. उमेश जाधव, डॉ. विपीन खडसे, बधिरीकरणशास्त्र विभागाचे डॉ. संदीप पटेल, डॉ. स्वाथी एम., डॉ. काजल साळुंखे यांच्यासह शस्त्रक्रिया विभागातील नर्सिंग प्रमुख निलिमा जोशी, नजमा शेख, सहायक जितेंद्र साबळे, जतीन चांगरे, किशोर चांगरे, गणेश डहाके, विवेक मराठे, विजय बागुल, माधुरी इंगळे, लिना चौधरी, कविता राणे यांनी शस्त्रक्रिया केली.

रुग्ण वैद्यकीय पथकाच्या निगराणीत

शस्त्रक्रिया झाल्यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपअधिष्ठाता डॉ. मारुती पोटे यांनी पथकाचे अभिनंदन केले. शस्त्रक्रियेनंतर तपासणीसाठी नमुने सूक्ष्मजीवशास्त्र व विकृतीशास्त्र विभागात पाठविण्यात आले आहे. रुग्णाला अतिदक्षता विभागात निरीक्षणासाठी ठेवण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com