डिजीलॉकरमध्ये मिळणार विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र

19 विद्यापीठांपैकी प्रमाणपत्र उपलब्ध करुन देणारे उमवी पहिले विद्यापीठ
डिजीलॉकरमध्ये मिळणार विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना 22 व्या दीक्षांत समारंभापासूनच्या सन 2013 पदवी प्रमाणपत्र हे डिजीलॉकर मध्ये उपलब्ध करून देण्यात आले असून 29 व्या दीक्षांत समारंभात प्रदान केल्या जाणारे पदवी प्रमाणपत्र हे समारंभानंतर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

भारत सरकारच्या डिजीटल इंडिया या उपक्रमांतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रमाणपपत्र डिजीलॉकर मध्ये उपलब्ध करून देण्यासंदर्भात दिलेल्या निर्देशान्वये डिजीलॉकरवर अकॅडेमिक अवार्ड रेकॉर्ड नोंदणी केली असून त्यानुसार सन 2013 अर्थात विद्यापीठाच्या 22 व्या दीक्षांत समारंभापासून पदवी प्राप्त करणार्‍या एकूण 1 लाख 23 हजार 564 विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र हे डिजीलॉकर मध्ये डिजीटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

कायदेशीर वैध राहिल प्रमाणपत्र

डिजीटल पदवी प्रमाणपत्रावर डिजिटल साईन असून त्या माहिती व तंत्रज्ञान कायदा 2000 नुसार कायदेशीर वैधता राहील.

याचा उपयोग नोकरी व शैक्षणिक कामासाठी उपयुक्त ठरणार आहे. 29 व्या दीक्षांत समारंभात पदवी प्रमाणपत्र मागणीसाठी अर्ज सादर केलेलया विद्यार्थ्यांना हे पदवी प्रमाणपत्र 3 मे रोजी दीक्षांत समारंभ संपन्न झाल्यानंतर डिजिलॉकरवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

डिजीलॉकरवर पदवी देणारे देशातले पहिले विद्यापीठ

देशातील एकूण विद्यापीठे,राज्य शैक्षणिक शिक्षण मंडळ, शैक्षणिक संस्था यांच्यापैकी फक्त 91 विद्यापीठे, राज्य शैक्षणिक शिक्षण मंडळ, शैक्षणिक संस्था यांनी डिजीलॉकर वर नोंदणी केली आहे.

राज्यातील अकृषि विद्यापीठांपैकी डिजिलॉकरवर विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र उपलब्ध करून देणारे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ ठरले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com