जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा व महाविद्यालये 15 मार्च 2020 पासून बंद करण्यात आले होते. आणि सदरील तारखेला सन 2019-20 हे शैक्षणिक वर्ष जवळपास पुर्ण होण्यात आले होते, म्हणून मागील वर्षी विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पास करण्यात आले होते.

परंतु सन 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये जवळपास 15 ते 20 टक्के किंवा त्याहूनही अधिक विद्यार्थी असे आहेत की, ज्यांनी संपूर्ण वर्षभर ऑनलाईन कींवा ऑफलाईन असे कुठल्याच प्रकारचे शिक्षण घेतलेले नाही.

असे सर्व विद्यार्थी कींवा पालक शालेय व्यवस्थापनाच्या संपर्कातही नाहीत व यापैकी ब-याच जणांनी कोरोनामुळे स्थलांतरही केलेले आहे.

एकदरीत अश्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देणे म्हणजे त्यांचे शैक्षणिक नुकसान केल्यासारखेच होईल कारण त्यांनी वर्षभर सदरील वर्षाचा अभ्यासक्रम पुर्ण केलेला नाही.

त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भविष्यात शैक्षणिक नुकसान होऊ शकते.त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन ईसा संघटनेच्या सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी राज्यभर असा निर्णय घेतला की, जे विद्यार्थी वर्षभर ऑनलाईन कींवा ऑफलाईन शिक्षणासाठी सतत गैरहजर होते त्यांना पुढील वर्गाकरीता प्रवेश देण्यात येणार नाही.

अशी भूमिका संघटनेने घेतलेली आहे.राज्यातील जवळपास 4200+ शाळा या निर्णयाची अंमलबजावणी करणार आहेत व आपल्या जिल्हयातील संघटनेच्या सर्व इंग्रजी सर्व शाळा या निर्णयात सहभागी होणार आहे अशी माहिती जळगाव ईसाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष आत्माराम तायडे , सचिव व्ही.डी.पाटील, प्रदेशाध्यक्ष राजेंद्र दायमा यांनी दिली.