जळगाव - Jalgaon

शहरातील प्रतापनगर येथील अँग्लो उर्दू हायस्कूल अँड नूरमोहम्मद चाचा ज्युनिअर कॉलेज,मध्ये वर्गात जात असताना जिन्यावर चक्कर येऊन पडल्याने मिधहत फातेमा नइम शेख वय १७ रा. शाहुनगर या ११ वी सायन्सच्या विद्यार्थिनीच्या मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली.

दरम्यान दहा वर्षांपुर्वी तिच्या बहिणीचाही याच पध्दतीने बिग बाजारमध्ये जिना चढत असताना चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला होता.

घटना घडल्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य बाबू शेख यांनी विद्यार्थिनीला दोन ते तीन खासगी रुग्णालयात हलवले यानंतर शासकीय महाविद्यालयात दाखल केले असता तिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

मिधहत फातेमा हिच्या पश्चात आई वडील दोन भाऊ असा परिवार आहे वडील हे रिक्षाचालक आहेत. घटनेची माहिती मिळाल्यावर संस्थेचे अध्यक्ष गफ्फार मलिक उपाध्यक्ष सईद चॉंद, उपप्राचार्य फारुख आमिर, सामाजिक कार्यकर्ते फारूख शेख यांनीही जिल्हा रुग्णालयात भेट देऊन माहिती जाणून घेतली व कुटुंबियांचे सांत्वन केले.

शवविच्छेदनात विद्यार्थिनीच्या डोक्याला मार लागुन गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.