कंटेनरखाली विद्यार्थिनी चिरडली

कंटेनरखाली विद्यार्थिनी चिरडली

मुक्ताईनगर येथे 12 वीच्या पेपरला जाताना अपघात

तालुक्यातील दुई येथील विद्यार्थिनी मुक्ताईनगर येथील परीक्षा केंद्रावर 12 वीच्या गणिताच्या पेपरसाठी येत असताना कंटेनर खाली दोन्ही पाय चिरडल्याने मरण पावली. सदर दुर्दैवी घटना आज सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास दुई ते पूर्णाडफाटा दरम्यान घडली.

मुक्ताईनगर तालुक्यातील दुई येथील मंदा अशोक पाटील जे .ई .स्कूल येथे बारावी सायन्स मध्ये शिकत होती. मंदा हिला मोटरसायकलवर घेऊन भगवान पाटील हे दुई येथून मुक्ताईनगर परीक्षा मंदा पाटील (वय 17 वर्षे) ही परीक्षा देण्यासाठी दुई येथून आजोबा भगवान गंभीर पाटील यांच्या सोबत मोटरसायकलवर निघाली होती . दुईकडून मुक्ताईनगरकडे केवळ दोन किलोमीटर अंतर कापल्यानंतर राशा बर्डाच्या वळणावर समोरून दोन कंटेनर त्यांना दिसले . वळणावरच एका कंटेनरला दुसरे कंटेनर ओव्हरटेक करीत येत होते . अशा परिस्थितीत मोटारसायकलवर मागे बसलेली मंदा हे मोटार सायकल वरून खाली पडली व तिच्या पायावरून कंटेनर गेले. त्या अपघातात मंदा अशोक पाटील ही विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली .अपघात होता बरोबर तिला मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ आणले .नंतर लगेच जळगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले . परंतु रस्त्यातच तिची प्राणज्योत मालवल्याची दुःखद घटना शुक्रवारी 11.15 वाजेच्या सुमारास घडली .

काका माझे पाय चांगले होतील का ?
बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील हे अपघातग्रस्त मुली जवळ गेले असता, काका मला वाचवा , काका माझे पाय चांगले होतील का हो …? अशी आर्त हाक देऊन वाचवण्याची विनंती करत होती. बालिकेचे ते शब्द ऐकून निवृत्ती पाटील यांच्या हृदयात चर झाले आणि त्यांचे डोळे पाणावले.

राशा बरडा जवळील वळण बनले मृत्यूचा सापळा…?

दुई ते पूर्णाड फाटा दरम्यान असलेले राशाबर्डा जवळील वळणदार रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून आजपर्यंत त्या ठिकाणी झालेल्या अनेक अपघातात अनेक जण नाहक बळी गेलेले आहेत. त्या ठिकाणी वनवे रस्ता बनविण्याची वारंवार मागणी होत असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आजपर्यंत कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com