लक्षवेधी आंदोलन : हातगाडीवर उलटा सिलिंडर ठेवून केंद्र शासनाचा तीव्र निषेध

लक्षवेधी आंदोलन : हातगाडीवर उलटा सिलिंडर ठेवून केंद्र शासनाचा तीव्र निषेध

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

गॅस दरवाढ Gas price hike मागे घ्या, पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्या, Petrol-diesel price hike वाढत्या महागाईवर आळा घाला, सर्व सामान्य नागरिकांना न्याय द्या अशा घोषणा देत महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे Women Nationalist Congress Party हातगाडीवर सिलेंडर उलटा ठेवत व टॉवरचौक ते शिवतीर्थ मैदानापर्यंत रॅली Rally काढत दिवसेंदिवस वाढणार्‍या महागाई विरोधात केंद्र शासनाचा निषेध Central government's protest करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगाव व महानगर महिला आघाडीतर्फे गॅस दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले. शहरातील शास्त्री टॉवर चौकापासुन आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर आंदोलनाचा समारोप करण्यात आला.

यावेळी उपस्थितांनी दिवसेंदिवस वाढणार्‍या गॅस दर वाढी व इंधन दरवाढीविरोधात केंद्र शासनाचा निषेध म्हणून रॅली काढण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, जिल्हा महानगर अध्यक्षा मंगला पाटील, वाल्मीक पाटील, राजेश पाटील, अशोक पाटील, विलास पाटील, अनिरुध्द जाधव, रिजवान खाटीक, मजहर पठाण, रहीम तडवी, अकील पटेल, सुशील शिंदे, विशाल देशमुख, मिनाक्षी चव्हाण, दिपीका भामरे, संगिता भामरे, सायायबिन पटेल, सुनीता सूर्यवंशी, आशा येवले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे महागाई विरोधात काढण्यात आलेल्या रॅलीचे मोर्चात रुपांतर झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ विविध घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले.

घोषणांचे फलक घेवून केंद्र शासानाचा निषेध

जनता कोरोनाने बेजार त्यात महागाईचा मार, बस करो मोदी सरकार बहोत हुई महंगाई की मार, जनता महागाईने त्रस्त पंतप्रधान महाल बांधण्यात व्यस्त यासह विविध घोषणांचे फलक महिलांनी हातात घेवून केंद्र शासनाचा महागाई विरोधात निषेध करण्यात आला.

तसेच विविध घोषणाबाजी करीत राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी महिला काँग्रेसने महागाई विरोधात आंदोलन केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com