भुसावळ - Bhusaval - प्रतिनिधी :

येथील दीपनगर वीज निर्मिती प्रकल्पातील कंत्राटी कागारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ

कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसाठी भिम आर्मीच्यानेतृत्वात दि. 4 रोजी सकाळी 10 वाजेपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आले. याबाबत रात्री उशीरापर्यंत प्रशासन व कामगारांमध्ये चर्चा सुरु होती.

याबाबत साई अंकुर इंटरप्राईजेस कंपनी प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात करोनाच्या पार्श्वभुमीवर कंपनीने कंत्राटी कामगारांना फक्त 13 दिवसांचे वेतन अदा केले.

याबाबत दीपनगर प्रकल्प प्रशासनाकडे कंत्राटी कामागरांनी साई अंकुर कंपनीचे कामगारांकडे लक्ष होत असल्याबाबत वारंवार लेखी तक्रारी करुन ही प्रशासनाने 4 नोव्हेंबर पर्यंत दखल न घेतल्यामुळे कामगारांनी सकाळी 10 वा. प्रकल्पाच्या 210 मे.वॅ. प्रकल्पाचे मुख्य गेट ते शक्तिगड पर्यंत पायी चालत घोषणाबाजी करत धरणे आंदोलन केले.

दरम्यान, प्रशासनाने चर्चेसाठी कामगरांना कार्यालयात बोलविण्यात आले. मात्र कामगारांनी प्रशासनानेच आंदोलन स्थळी दाखल होत चर्चा करण्याचा आग्रह धरला यामुळे वातावरण काही काळ चिघळले होते.

दरम्यान सायंकाळी उशिरा चार तासांहून अधिककाळ प्रशासन व आंदोलकांमध्ये चर्चा सुरू होती. अप्रिय घटना टाळण्यासाठी डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोनि रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

कामगारांच्या मागण्या अशा - लॉकडाऊन मधील एप्रिल, मे, जुन या कालखंडात कंपनीकडून अदा न झालेले 26 दिवसांचा पगार द्यावा.

या काळातील सर्व भत्ते देण्यात यावे. ग्रीलींग व रँकींग नागपूर ट्रान्सपोर्ट कंपनी लेबर सप्लायमध्ये लागू करण्यात यावी तसेच 1 ऑक्टोबर 2020 पासून किमान वेतन कायद्यांतर्गत वेतन अदा करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.