चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी चाळीसगांव नगरपालीका हद्दीत जिल्ह्याधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी शासकीय दोन दिवस बंदचे आदेश जाहीर केले असून हा दोन दिवसीय लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे कडोकोडपणे पालन करण्याचे आवाहन महसूल प्रशासनातर्फे आयोजित बैठकीत करण्यात आले आहे.

चाळीसगाव नगरपरिषद हद्दीत शनिवार दि. १३ मार्च २०२१ रोजी रात्री १२ वाजेपासून दि. १४ मार्च २०२१ च्या रात्री १२ वाजेपर्यंन्त दोन दिवसीय लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने तहसील कार्यालयात आज संकाळी ११ वाजता राजकिय पदाधिकारी, व्यापारी, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आदिची सयुक्तरित्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होेते.

या बैठकीस खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, प्रातांधिकारी लक्ष्मीकांत सातळकर, तहसीलदार अमोल मोरे, नायबतहसीलदार विशाल सोनवणे, न.पा.चे प्रभारी मुख्याधिकारी विकास नवाळे, उपविभागीय पोलिस आधिकारी कैलास गांवडे, पोलीस निरिक्षक विजयकुमार ठाकुरवाड आदि उपस्थित होते.

तालुक्यात गेल्या आठ दिवसात कोरोना रुग्णाची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी चाळीसगाव न.पा.च्या हद्दीत दोन दिवसीय लॉकडाऊनची घोषणा केली आहे. हा बंद पाळण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. लॉकडाऊनचे पालन केले तरच कोरोनाची साखळी तुटू शकेल, अन्यथा पुन्हा लॉकडाऊन लावण्याची पाळी चाळीसगावात येणार आहे. जिल्ह्यात चाळीसगावच्या रुग्ण संख्येत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे दोन दिवसीय लॉकडाऊनचे कडेकोड पालन करण्याचे आवाहन बैठकीत खासदार, आमदार, प्रातांधिकारी व तहसीलदार यांनी केले. नियमाचे उल्लघन करणार्यावर मात्र यावेळी कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा वजा सूचना बैठकीत पोलिस निरिक्षक वियजकुमार ठाकुरवाड यांनी दिला. तर लॉकडाऊनसह तालुक्यातील लसीकरणावरही भर द्या अशा सूचना खासदारांनी यावेळी दिल्यात. या बैठकीत राजकिय पदाधिकार्यांसह व्यापारी व समाजीक संघटनांचे, महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन, आरोग्य, नगरपरिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.