पोलिसांची संकाळी कारवाईसाठी धामधुम, दुपारी सामसुम

चाळीसगाव : दुपारनतंर शहरातील अनेक चौकात पोलीस नसल्याचे चित्र, ब्रेक द चेनसाठी कठोर अंमलबजावणी गरज
पोलिसांची संकाळी कारवाईसाठी धामधुम, दुपारी सामसुम

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव येथे लॉकडाऊनच्या दुसर्‍या दिवशी पुन्हा रस्त्यांवर लोकांची मोठ्या प्रमाणात ये जा सुरु असून लोकांमध्ये कोरोनाची भिती आहे की नाही असा प्रश्‍न निर्माण होत आहे. किरकोळ कारणांसाठी लोक घराबाहेर पडून रस्त्यावर गर्दी करीत असल्याने आज सकंाळी फक्त सिग्नल चौकात वाहतुक पोलिस व शहर पोलिसांकडून कारवाई केली जात होती. यात न.पा.चे पथकाकडून दंड मास्क न लावणार्‍यांकडून दंड वसूल केला जात होता. परंतू दुपारी १२ वाजेनतंर पोलीस रस्त्यावर दिसेनासे झाले. फक्त सिग्नल चौकात एक महिला वाहतुक पोलीस कर्मचारी दिसून आली.

वाहतुक पोलिसांनी फक्त संकाळी आपले कारवाईच टायरगेट पूर्ण करण्यासाठी सिग्नल चौकात गर्दी केल्याचे दिसून आले. शहर पोलीस देखील संकाळी कारवाईसाठी सिग्नल चौकात हजर होते. परंतू दुपारी ते देखील दिसत नव्हते. विशेष म्हणजे काल फक्त सायंकाळी रोडावर फिरणार्‍यांची रॅपीड टेस्ट घेण्यात आली. संकाळी मात्र कुठेही रॅपीड टेस्ट घेण्यात आली नाही. जर हिच टेस्ट दिवसभर घेण्यात आली, तर रस्त्यावरील विनाकारण फिरणार्‍या गर्दीला आला बसेल. जर संचारबंदी पूर्णता; यशस्वी करायची असेल तर पोलिसांनी दिवसभर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com