रेमडीसीवरचा काळाबाजार त्वरित थांबवा

चाळीसगाव : हिरकणी महिला मंडळाची मागणी
रेमडीसीवरचा काळाबाजार त्वरित थांबवा

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यात रेमडीसीवर इंजेक्शनेचा काळा बाजझर होत असून याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. प्रशासनाने याकडे जातीने लक्ष घालून रुग्णांची होणारी गैरसोय टाळावी व लवकरात लवकर रेमडीसीवरचा मुबलक प्रमाणात साठा चाळीसगावकरांसाठी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी स्वर्गीय लोकनायक तात्यासाहेब महेंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान संचालित हिरकणी महिला मंडळ चाळीसगाव यांनी केली आहे. यसंबंधीचे नवेदन त्यांनी तहसीलदार अमोल मोरे यांना दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, सध्या देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने धुमाकूळ घातला असून कोविड १९ संसर्गाने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात घरातले कर्ते पुरुष गेल्याने अनेक कुटुंबावर संकट ओढावले आहे, चाळीसगाव शहरात सरकारी रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात रुग्णांना उपचारार्थ बेड मिळणे जिकरीचे झाले आहे, यात ऑक्सिजन, व व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णांची गैरसोय होत असून उपचारार्थ लागत असलेले रेडमिसीवर इंजेक्शनचा सर्वत्र तुटवडा भासत आहे.

रुग्णाच्या नातेवाईकांची तारांबळ होत आहे, मात्र शहरात रेडमिसीवर इंजेक्शनचा जादा दराने विकले जास्त असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तरी हा गैरप्रकार थांबवला जावा व शासनाने तात्काळ इंजेक्शनची उपलब्धता करून द्यावी. या आशयाची मागणी आज शहरातील हिरकणी महिला मंडळाच्या वतीने करण्यात आली असून या आशयाचे निवेदन तहसीलदार अमोल मोरे तसेच सहायक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस लक्ष्मीकांत यांना देण्यात आले. यावेळी नगरसेविका सविता राजपूत, हिरकणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ सुचित्रा राजपूत आदि उपस्थित होत्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com