करोना विषयी गंभीर मॅसेज थांबवा - डॉ संदिप जोशी

रूग्णांचे मानसिक खच्चीकरण होते
करोना विषयी गंभीर मॅसेज थांबवा - डॉ संदिप जोशी

अमळनेर - Amalner - प्रतिनिधी :

करोना विषाणूच्या सोशल मिडीयाच्या माद्यमातून पसरणाऱ्या बातम्यां पासून प्रत्येकाने स्वतःला दूर ठेवावे कारण याबद्दल आपल्याला जे जे माहिती असायला हवं ते बहूतांश माहिती झालेलं असून करोनाने कितीजण दगावले ते पाहत बसू नका. ही एखादी क्रिकेट मॅच नाही की ज्याचा लेटेस्ट स्कोर काय झाला ते तुम्हाला माहिती असायलाच हवं, त्यामुळे याकडे लक्ष देणे पूर्णपणे टाळावे असे आवाहन कोरोना ईजारावर यशस्वी उपचार करणारे नर्मदा मेडीकल फाऊंडेशनचे डॉ.संदिप जोशी यांनी केले आहे.

गेल्या वर्षी करोना हा आजार आमचेसह सर्वांनाच नविन होता मात्र त्याची बहूतांश माहिती यावेळी मिळाली आहे हा आजार घातक असला तरि वेळीच ऊपचार व काळजी घेतल्यास रूग्ण बरा होतो गेल्या काही दिवसांपासून या आजारावरिल वेगवेगळी माहिती पसरत असल्याचे दिसून येते यावर मानसशास्त्रज्ञांकडून काही सूचना आहेत

त्यात नागरिकांनी पाळाल्यास मृत्यूचे प्रमाण नक्कीच कमी होवू शकते याबाबत डॉ संदिप जोशी म्हणतात कि कोरोना विषयी इंटरनेटवर अधिक माहिती शोधू नका, याने तुमचे मानसिक खच्चीकरण होऊ शकते. गंभीर मेसेजेस इतरांना पाठवणे त्वरित थांबवा. तुम्ही जितके मनाने खंबीर असाल तितकीच खंबीर समोरची व्यक्ती असेलच असे नाही (याने मदत तर होणार नाहीच उलट तुम्ही समोरच्याला डिप्रेशनमध्ये टाकू शकता) शक्य झाल्यास घरात शांत मंद आवाजात आवडते संगीत ऐका. लहानग्यांशी खेळ खेळा, त्यांना छान छान गोष्टी सांगा भविष्यात काय काय करणार याविषयी चर्चा करा. घरात वारंवार हात धुण्याची सवय लावून घ्या, त्यासाठी सर्वांसाठी गजर लावून ठेवा. तुमचा सकारात्मक मूड तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला वाढवतो, परंतु तोच मूड नकारात्मक असेल तर तीच रोगप्रतिकारक शक्ती मंदावते आणि विषाणूशी लढा देण्यास कमकुवत ठरते. सर्वात महत्वाचे, हे सगळं एक ना एक दिवस टळणार आहे आणि आपण सर्वजण सुरक्षित होणार आहोत हे ध्यानात ठेवा.
तुमचे भविष्यातील आखाडे काय असतील त्यावर लक्ष केंद्रित करा , हीच ती योग्य वेळ आहे जीचा सदुपयोग तुम्हाला तुमची वैयक्तिक आणि व्यावसायिक उद्दिष्टे काय आहेत त्यावर विचार करण्याची. विनोदी चित्रपट, साहित्य पहा कारण विनोदाने बराच ताणतणाव कमी होतो आणि ते एक उत्तम औषध आहे.

त्यासाठी सकारात्मक राहा, सुरक्षित राहा. व कोरोना पासून स्वतःला व आपल्या कूटूंबाला वाचवा असा सल्ला डॉ संदिप जोशी यांनी दिला आहे डॉ जोशी हे एम डी गोल्ड मेडेलीस्ट असून गेल्या वर्षीच्या कोरोनाचे पहिल्या लाटेपासून ग्रामिण रूग्णालयात मानसेवी वैद्यकीय सेवेसह त्यांचे रूग्णालयात खाजगीत अनेकांवर यशस्वी पणे ऊपचार करित आहेत

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com