आ.बं.हायस्कूलमध्ये चित्रित हॉरर चित्रपटाचे प्रसारण थांबवा ; अध्यक्षांचे चेअरमन यांना पत्र

परछाया वेब सिरीज १८ वर्षांपुढील प्रेक्षकांसाठी पाहणे योग्य
आ.बं.हायस्कूलमध्ये चित्रित हॉरर चित्रपटाचे प्रसारण थांबवा ; अध्यक्षांचे चेअरमन यांना पत्र

मनोहर कांडेकर - चाळीसगाव - chalisgaon - प्रतिनिधी :

महाराष्ट्रातील शंभर वर्षांची परंपरा असलेल्या आ.बं.हायस्कूलमध्ये ‘ परछाया ’ या हॉरर वेब सिरीज लघू चित्रपटाचे शूटिंग करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.

वेब सिरीज असलेला लघू चित्रपट फक्त १८ वर्षांपुढील प्रेक्षकांसाठीच पाहणे योग्य आहे. त्यामुळे आ.बं. शाळेत शिक्षण घेणार्‍या १६ वर्षा आतील विद्याथ्यार्ंवर यांचा वाईट परिणाम भविष्यात होवू शकतो, म्हणून या चित्रपटाचे प्रसारण त्वरित थांबविण्यासाठी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.बाळासाहेब चव्हाण यानी संस्थेचे चेअरमन नारायण अग्रवाल यांच्यासह उपाध्यक्ष, विश्‍वस्त व सर्व संचालक यांना लेखी पत्र दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या पत्रामुळे हॉरर चित्रपटाचे प्रकरण चांगलेच तापले असून चित्रपट प्रसारण थांबविल्यावरच ते शमणार असल्याचं दिसत आहे.

चाळीसगावच्या शैक्षणिक इतिहासात महत्वाची भूमिका बजावणारी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी, या संस्थेच्या बालवाडी पासून तर महाविद्यालयापर्यंत अनेक शाखा आहेत.

परंतू आ.बं. हायस्कूलमध्ये चित्रकरणाची परवागी देतांना १८ वर्षाआतील मुलांचा संस्थेच्या चेअरमनानी विचार केलेला नाही, इतर संचालकांशी सल्ला-मसलत न करता हुकूमशाही पद्धतीने चित्रीकरणास परवागी दिली.

चित्रपटाची परवागी देतांना हा विषय संस्थेच्या मॅनेजिंग बोर्डच्या बैठकीत घेणे अपेक्षित होते. परंतू संस्थेच्या संचालकांनी याबाबत इतर संचालकांचे मत विचारात न घेता, हुकूमशाही पद्धतीने हॉरर चित्रपटाच्या चित्रीकरणास परवागी दिली. त्यामुळे आता संस्थेचे अध्यक्ष प्रा.बाळासाहेब यांनी या हा चित्रपट १८ वर्षापुढील मुलांसाठी पाहणे योग्य आहे. त्याचा आपल्या आ.बं.हायस्कूलच्या १६ वर्षा आतील विद्यार्थावर विपरीत परिणाम होवू शकतो.

त्यामुळे या चित्रपटाचे प्रसारण त्वरित थांबविण्यासाठी संस्थेचे चेअरमन नारायण अग्रवाल यांच्यासह विश्‍वस्त, उपाध्यक्ष व सर्व संचालक यांना दि,२४ रोजी लेखी पत्र दिले असून हॉरर चित्रपटाचे प्रसारण त्वरित थांबविण्याची विनंती केली आहे. आता या पत्रामुळे तरी चेअरमन नारायण अग्रवाल चित्रपटाचे प्रसारण थांबवतात का ? चित्रपटाचे भयानक दृश्य विद्यार्थ्यांना पाहू देतात? हे पाहणे गरजेचे आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com