जळगाव : रस्त्यांवर साचले पाणी
जळगाव

जळगाव : रस्त्यांवर साचले पाणी

वाहनधारकांची कसरत

Rajendra Patil

जळगाव - प्रतिनिधी Jalgaon

जिल्ह्यात दोन दिवसांपासून सर्वत्र चांगला पाऊस होत असून काल आणि आज झालेल्या पावसामुळे अनेक धरणे ओसंडून वाहू लागले आहेत. हतनुरचे ३६ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आल्याने तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आज दि.१६ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच कसरत झाली. यात कोर्ट चौक, नवी पेठ भागात तर सर्व रस्ते जलमय झाल्याचे दिसून आले.

Deshdoot
www.deshdoot.com