190 अधिकार्‍यांसह कर्मचारी सेवानिवृत्त

प्रशासनातर्फे निरोप
190 अधिकार्‍यांसह कर्मचारी सेवानिवृत्त
देशदूत न्यूज अपडेट

जळगाव - Jalgaon :

शासकीय कार्यालयांतील कर्मचारी आपल्या प्रदिर्घ सेवेनंतर दि. 31 मे रोजी निवृत्त झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सहा, पोलीस प्रशासन विभागातील 40, महानगरपालिकेतील 32, जिल्हा परिषदेतील 97, ग.स.सोसायटीतील 15 असे एकूण 190 कर्मचारी सेवानिवृत्त झाले. दरम्यान, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा कार्यालयांमध्ये गौरव करुन निरोप देण्यात आला.

भविष्य निर्वाह निधीची रक्कम खात्यात जमा करुन मनपाच्या 32 कर्मचार्‍यांना निरोप

महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना निवृत्तीच्या दिवशीच भविष्य निर्वाह निधीची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती मुख्य लेखाधिकारी कपिल पवार यांनी दिली. तसेच प्रथमच कर्मचार्‍यांची जीपीएफची यादी सुजीत चौधरी यांनी तयार केली आहे.

दरम्यान, सोमवारी 31 मे रोजी मनपाच्या 32 कर्मचार्‍यांना सेवानिवृत्तीपर निरोप देण्यात आला. मनपाचे 32 कर्मचारी निवृत्त झाले आहे.

निवृत्त कर्मचार्‍यांना आयुक्त सतीष कुलकर्णी, उपायुक्त प्रशांत पाटील, शाम गोसावी, उपायुक्त तथा मुख्य लेखा परीक्षक संतोष वाहुळे, मुख्य लेखाधिकारी कपिल पवार, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. यात नजीर शेख सांडू, हेमचंद्र चौधरी, चंद्रकांत गायकवाड, राजेंद्र सुलाखे, राजेंद्र दिवेकर, मुरलीधर चौधरी, मसुद अहमद खान, सुधाकर कापसे, राजेंद्र चौधरी, सुनिता गुरचळ, मंगला यादव, सुखलाल बारी, विलास नेहेते, अरुण हरीमकर, छाया पाटील, शकुंतला सोनवणे, रविंद्र कदम, सुधाकर सोनवणे, शेख कादर शेख नबी, सुखलाल बाविस्कर, रमेश कोळी, सुरेश सपकाळे, छोटू न्हावी, रवींद्र चौधरी, अशोक विसपुते, सुभाष सोनवणे, रतन पवार, नारायण काळे, रहिमोद्दीन शेख महेबुब, शिवचरण पांडे यांचा समावेश आहे. सुत्रसंचालन प्रभाग अधिकारी उदय पाटील यांनी तर आभार राजेंद्र पाटील यांनी मानले.

ग.स.सोसायटीचे 15 कर्मचारी निवृत्त

ग.स.सोसायटीच्या विविध शाखेतील अधिकारी-कर्मचार्‍यांचा सेवा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांना आपल्या विभागातर्फे सत्कार करुन निरोप देण्यात आला. यात जिल्ह्यातील ग.स.सोसायटीच्या विविध शाखेतील 15 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. यात जळगाव ग.स.सोसायटीच्या मुख्यकार्यालयातील विभाग अधिकारी निंबा सोनवणे, पाचोरा शाखाधिकारी दिलीप बी.पाटील, शिवाजी पाटील मुक्ताईनगर, बाळू पाटील पारोळा, प्रकाश पाटील चाळीसगाव, अशोक पाटील पारोळा,लिपीक रवींद्र पाटील जळगाव, उपशाखाधिकारी जगन्नाथ पाटील, रामराव सोनवणे एरंडोल,शाखाधिकारी दिलीप एन.पाटील रावेर, दिलीप टी.पाटील पाचोरा, शाखाधिकारी किशोर आ.पाटील अमळनेर, शाखाधिकारी भिकन सोमवंशी चाळीसगाव, शाखाधिकारीप्रमोद मेढे रावेर, भागवत पाटील पारोळा यांचा समावे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यालयासह सर्वांचा आपआपल्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशासक मंडळाचे प्रमुख विजयसिंह गवळी, प्रशांत विरकर, भाऊसाहेब महाले, व्यवस्थापक सुभाष पाटील, प्रशासन अधिकारी वाल्मीक पाटील, कर्ज अधीक्षक श्यामकांत सोनवणे आदी उपस्थित होते.

जिल्हा पोलीस दलातील 40 कर्मचारी सेवानिवृत्त

जळगाव जिल्हा पोलीस दलातून आज सोमवारी एकूण 40 पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या सर्व कर्मचार्‍यांसह अधिकार्‍यांना पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंगलम हॉल येथे कार्यक्रमात पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सत्कार करण्यात येवून निरोप देण्यात आला. निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांमध्ये चोपडा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक, जळगाव शहरातील जिल्हापेठ व एमआयडीस तसेच अडावद येथील असे एकूण 3 पोलीस उपनिरिक्षक तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याचे एकूण 23 सहाय्यक फौजदार, 9 पोलीस हेडकॉन्स्टेबल, 1 पोलीस नाईक, 1 पोलीस शिपाई व एक सफाई कामगार अशा 40 जणांचा समावेश आहे.

चोपडा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग तसेच जिल्हापेठचे पोलीस उपनिरिक्षक मगन मराठे, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक रामकृष्ण पाटील, अडावद पो.स्टे.चे पोलीस उपनिरिक्षक गोकूळसिंग बयास तसेच पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ लिपिक शांताराम मोरे, सहाय्यक फौजदार रविंद्र पाटील , नामदेव माळी, राजेंद्र महाजन, रमेश पाटील, राजेंद्र कोलते, नागपाल भास्कर, महेबुब तडवी, संतोष पवार, शकुर शेख, रविंद्र माळी, मोहम्मद शेख , रमेश कारले, सलिम पिंजारी, अमृत पाटील, कोमलसिंग पाटील, भागवत गालफाडे, ममराज जाधव, दत्तू खैरनार, अनिलकुमार लोखंडे, पंडीत मराठे, हिरामण तायडे, विश्वास पाटील, सुमन पटाईत, पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास राणे, शैला जगतराव बाविस्कर, उत्तम चिकटे, ज्ञानेदव घुले, वसंत मोरे, सुभाष महाजन, मधुकर पाटील, रविंद्र महाले, प्रकाश चौधरी, पोलीस नाईक रघुनाथ कोळी, पोलीस शिपाई शांताराम सोनवणे, सफाई कामगार अशोक गांगाडीया असे एकूण 40 कर्मचारी आज सेवानिवृत्त झाले. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.

जि.प.अतिरीक्त सीईओंसह 97 कर्मचार्‍यांचा गौरव

जिल्हा परिषदेतील अतिरीक्त सीईओंसह 97 कर्मचार्‍यांचा सत्कार आपल्या विभागातर्फे करुन निरोप देण्यात आला. यात जि.प.चे अतिरीक्त सीईओ तथा डीआरडीचे प्रभारी संचालक गणेश चौधरी, चोपड्याचे शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे तर सामन्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी विनायक पाटील,वरिष्ठ सहायक रामकृष्ण नेटके, सहाय्यक प्रशासन अधिकारी गंगाधर जोशी, ग्रा.प.विस्तार अधिकारी एस.पी.पाटील, स्थापत्य विभागाचे सहाय्यक अधिकारी रामेश्वर कुंभार, सहाय्यक प्रशासन अधिकारीशालीग्राम निंबाळकर, कनिष्ठ सहाय्यक गंगाराम महाजन, केंद्रप्रमुख अरुण मोरे अमळनेर, ग्रेडेड मुख्याध्यापक आशा भदाणे, राजेश साळुंखे, जळगाव तालुक्यातील केंद्रप्रमुख दत्तू ठाकूर, भडगाव तालुक्यातील ग्रेडेड मुख्याध्यापक शंकर भटू मोरे, ग्रेडेड मुख्याध्यापक शंकर वेडू मोरे, भुसावळ तालुक्यातील केंद्रप्रमुख नलिनी झांबरे,उपशिक्षिका मालती बाविस्कर, केंद्रप्रमुख भिकाजी बोदडे यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागातील 97 कर्मचारी अधिकारी यांना सेवापूर्तीनिमित्त सत्कार करुन निरोप देण्यात आला.

जि.प.चे अतिरीक्त सीईओ गणेश चौधरी यांचा सत्कार जि.प.अध्यक्षा रंजना पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, प्रल्हाद पाटील, आर.जी.पाटील, पद्मसिंग पाटील,प्रशांत पाटील, सीईओ.डॉ.बी.एन.पाटील, उपमुख्यकार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांच्यासह अधिकार्‍यांचा समावेश होता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com