भुसावळ (प्रतिनिधी) Bhusawal

रेल्वे प्रशासनाने प्रवाश्यांच्या सोयीसाठी पुढील सुचना मिळेपर्यंत हटिया -पुणे, मालदा टाउन -सुरत विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

हटिया -पुणे विशेष गाडी - ०२८५० डाऊन पुणे -हटिया विशेष गाडी ७ फेब्रुवारीपासून दर बुधवार, रविवारी पुणे येथून १०.४५ वाजता रवाना होऊन दुसर्या दिवशी हटिया येथे दुपारी ४.२५ वाजता पोहचेल. ०२८४९ अप हटिया-पुणे विशेष गाडी ५ फेब्रुवारीपासून दर सोमवार, शुक्रवारी हटिया येथून रात्री ८.०५ वाजता रवाना होऊन तिसर्या दिवशी पहाटे २.४५ वाजता पुणे पोहचेल. ही गाडी बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड.

मालदा टाउन -सुरत विशेष गाडी - ०३४२५ अप मालदा टाउन -सुरत विशेष गाडी ६ फेब्रुवारी पासून दर शनिवारी मालदा टाउन येथून दुपारी १२.३० वाजता रवाना होऊन तिसर्या दिवशी पहाटे ४ वाजता सुरत पोहचेल. ०३४२६ डाऊन सुरत-मालदा टाउन विशेष गाडी ८ फेब्रुवारी पासून दर सोमवारी सुरत येथून दुपारी २.२० वाजता रवाना होऊन तिसर्या दिवशी सकाळी ६.१५ वाजता मालदा टाउन ला पोहचेल.

जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, रांची, मुरी, बोकारो स्टिल सिटी, चंद्रपुरा, धनबाद, आसनसोल, दुर्गापूर, सिवरी, रामपूर हट, पकौर, न्यू फरक्का स्थानकांवर थांबेल. प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले अहे.