विशेष पुरवणीचे प्रकाशन करतांना अष्टभुजा जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी
विशेष पुरवणीचे प्रकाशन करतांना अष्टभुजा जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी|भुसावळ
जळगाव

जेष्ठ नागरिक ‘देशदूत’च्या ऋणात

भुसावळ विभागीय कार्यालय वर्धापन दिन विशेष पुरवणी प्रकाशन प्रसंगी जी.आर. ठाकूर यांचे प्रतिपादन

Ashish Patil

Ashish Patil

भुसावळ - Bhusawal :

दै. देशदूत’च्या भुसावळ विभागीय कार्यालयाच्या वर्धापदन दिन विशेष पुरवणीचे प्रकाशन नेहमीच जेष्ठांच्या हातून करण्यात येते. या वर्षीही आपल्या हातून विशेष पुरवणीचे प्रकाशन होत आहे. त्यामुळे आपण त्यांचे ऋणी रहायला पाहिजे. आपल्या हातून या पुरवणीचे प्रकाशन होणे ही मोठी व उल्लेखनिय बाब आहे. देशदूत जेष्ठांना मानच देत नाही तर आपल्या वृत्तपत्रात ते स्थानही देतात. अशीच माया त्यांनी जेष्ठ नागरिक संघावर कायम ठेवण्याचे आवाहन करत असल्याचे प्रतिपादन येथील अष्टभुजा जेष्ठ नागरिक संघाचे मार्गदर्शक जी.आर. ठाकूर (मामा) यांनी केले.

ते दि.१४ रोजी दै.‘देशदूत’च्या भुसावळ विभागीय कार्यालय वर्धापन दिन विशेष पुरवणीच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते. येथील म्युनिसीपल स्टाफ कॉलनी येथील दिनकरराव बेंडाळे यांच्या निवासस्थानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रघुनाथ आप्पा सोनवणे यांनी, देशदूत ने अनेक वर्षापांसून जेष्ठ नागरिकांवर प्रेम कायम ठेवले असून ते आमच्या सुखदु:खात सहभागी होतात. पुरवणी प्रकाशनाची जबाबदारी जेष्ठांना देतात यामुळे आम्हीही भाराऊन जात असल्याचे सांगत देशदूतच्या भविष्यातील वाचालीस जेष्ठ नागरिकांच्या सदिच्छा असल्याचे सांगितले.

प्रसंगी रागिणी पुराणिक यांनी ही मनोगत व्यक्त केले. तर संघाचे सभासद प्रकाश विसपुते यांनी आभार प्रदर्शनत देशदूत नेहमीच पुरवणी प्रकाशनाची जबाबदारी जेष्ठ नागरिकांकडे देत असल्याने आम्ही त्यांच्या ऋणात राहु इच्छितो असे सांगितले.

यावेळी संघाचे उपाध्यक्ष सुरेश कुरमभट्टी, सदस्य आर.एल. पाटील, माजी अध्यक्ष महादेवराव हरीमकर, अलका अहिरराव, दिनकर बेंडाळे, अर्जुन विसपुते, श्रीपाद चौक, गणेश इंगळे,लता बेंडाळे या पदाधिकार्‍यांसह दै. देशदूतचे मुख्य उपसंपादक निरज वाघमारे, सहाय्यक जाहिरात व्यवस्थापक शंतनू गचके, वितरण अधिकारी कपिल नेवे, उपसंपादक आशिष पाटील, ललित फिरके (न्हावी ता.यावल), वृत्तपत्र वितरक श्रीकांत कुलकर्णी, राष्ट्रीय मानवाधिकार महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रा. संजय मोरे, विनोद ठाकरे, मिहिर गचके आदी उपस्थित होते

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com