‘ब्रेक द चेन’अंतर्गत विशेष निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले

आदेशाचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई-जिल्हाधिकारी
‘ब्रेक द चेन’अंतर्गत विशेष निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले
USER

जळगाव - Jalgaon

कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी 14 एप्रिल, 2021 च्या आदेशान्वये संपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी दिनांक 1 मे, 2021 रोजी सकाळी 7 वाजेपावेतो फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 सह विशेष निर्बध लागू करण्यात आलेले आहेत.

तर 20 एप्रिल, 2021 अन्वये सुधारीत विशेष निर्बध लागू करण्यात आलेले आहेत. संपूर्ण जळगाव जिल्ह्याकरीता लागू करण्यात आलेले संचारबंदीसह विशेष निर्बध दिनांक 15 मे, 2021 रोजी सकाळी 7.00 वाजेपावेतो वाढविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.

या आदेशानुसार लागू करण्यात आलेल्या निर्बधांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तरित्या पोलिस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com