चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

चाळीसगाव तालुक्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्ंगत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिकेतील चाळीसगाव तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व आधार क्रमांकाचे सिडींग १०० टक्के पूर्ण करण्याच्या सुचना केंद्र शासनाकडून देण्यात आलेल्या आहेत.

शिधापत्रिकेतील ज्या लाभार्थ्याचें आधारक्रमांक आणि मोबाईल सिडींग अद्याप झालेले नाही अशा लाभार्थ्यांना ही कार्यवाही करता यावी, यासाठी शासनाने दिनांक ३१ जानेवारी, २०२१ पर्यंत विशेष मोहिम आयोजित केली आहे.

दिनांक १ जानेवारी, २०२१ पासुन जळगाव जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकानात त्या दुकानाशी संलग्न असलेल्या ज्या लाभार्थ्यांचे आधार आणि मोबईल क्रमांक सिड झालेले नाहीत अशा लाभार्थ्यांची यादी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

चाळीसगाव तालुक्यातील रास्त भाव दुकानाशी संलग्न असलेल्या लाभार्थ्यांनी दुकानास भेट देऊन सदर यादी तपासुन घ्यावी. त्यांचे आधार किंवा मोबाईल सिंडींग झाले आहे किंवा नाही हे तपासुन घेण्याची जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची आहे. या यादीत ज्या लाभार्थ्याचें आधार / मोबाईल क्रमांक सिड झालेले नाहीत अशा लाभार्थ्यांनी संबंधित दुकानदारांकडे असलेल्या ई-पास मशिनव्दारे त्यांचे आधार आणि मोबाईल क्रमांक सिड करुन घ्यायचे आहेत.

या योजनेची कार्यवाही दिनांक ३१ जानेवारी, २०२१ पर्यंत पुर्ण करावयाची असल्याने दिनांक ३१ जानेवारी, २०२१ पर्यंत आधार सिडींग न झालेल्या लाभार्थ्याचे देय धान्य जोपर्यंत आधार सिडींग होत नाही, तोपर्यंत धान्य मिळणार नाही. व यामुळे लाभार्थी अन्नधान्यापासुन वंचित राहिल्यास संबंधित लाभार्थ्यांची जबाबदारी राहणार आहे.

चाळीसगाव तालुक्यातील ज्या लाभार्थ्यांचें (रेशनकार्डधारक) आधार आणि मोबाईल क्रमांक अद्याप सिड झालेले नाहीत अशा लाभार्थ्यांनी त्यांचे रास्त भाव दुकानात जाऊन यादी तपासुन घ्यावी आणि आधार, मोबाईल क्रमांकाचे सिडींग करुन घ्यावे, असे आवाहन तहसिलदार अमोल मोरे चाळीसगाव यानी केले आहे.