52 हजारांची लाच घेताना विशेष लेखापरीक्षक गजाआड
जळगाव

52 हजारांची लाच घेताना विशेष लेखापरीक्षक गजाआड

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon :

विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे लेखापरिक्षण पूर्ण करुन देण्यासाठी 52 हजारांची लाच घेतांना विशेष लेखापरिक्षक रावसाहेब जंगले यांना नाशिकच्या लाचलूचपत प्रतिबंधक पथकाने आज अटक केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, विविध कार्यकारी सोसायट्यांचे लेखापरिक्षण अपूर्ण असून ती पूर्ण करुन देण्यासाठी जंगले यांनी संबंधीत सोसायटीकडे 52 हजारांची लाचेची मागणी केली होती.

त्यासंदर्भात संबंधीत विकासो ने तक्रार केल्यानंतर नाशिक येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख उज्वल पाटील यांच्या पथकाने आज दि. 5 रोजी रावसाहेब जंगले यांना 52 हजाराची लाच घेतांना रंगेहाथ अटक केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com