नागरिकांच्या समस्या मार्गी लावा - खा.उन्मेष पाटील

चाळीसगाव येथे आढावा बैठकीत आधिकार्‍यांना सूचना
नागरिकांच्या समस्या मार्गी लावा - खा.उन्मेष पाटील

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी-

शहरातील चौधरीवाडा, जहागीरदारवाडी व शहराच्या अनेक भागात परंपरागत पन्नास वर्षाच्या जुन्या जागांवर नागरिकांचा रहिवास असून गावठाण जागा असल्याने त्यांना त्या जागेचा उतारा मिळत नाही. परिणामी अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हा उतारा मिळण्यासाठी नगरपालिका प्रशासन, महसूल प्रशासन आणि भूमी अभिलेख कार्यालय यांनी मिळून ही समस्या वर तोडगा काढा. नागरिकांना कुठल्याही आर्थिक भुर्दंड न होता त्यांना उतारा कसा देता येईल याबाबत कार्यवाही करा. येत्या सोमवारी याबाबत आढावा सादर करा अशी सूचना खासदार उन्मेश पाटील यांनी दिल्या आहेत.

चाळीसगाव येथील तहसीलदार कार्यालयात सोमवारी दुपारी बारा वाजता बैठक संपन्न झाली. यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, लोकनियुक्त नगराध्यक्ष आशालता चव्हाण, मुख्याधिकारी नितीन कापडणीस व्यासपीठावर उपस्थित होते.

खासदार उन्मेश पाटील यांनी शासन निर्णयाच्या अधीन राहून या नागरिकांना या समस्येतून बाहेर काढण्यासाठी तातडीने उपाययोजना करा व याबाबत येत्या सोमवारी बैठक घेऊन आढावा बैठकीत याबाबतचा तपशील सादर करा. समस्याग्रस्त सर्व नागरिकांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही. याची काळजी घ्यावी. तसेच घरकुलांबाबत जो सर्व्हे केला आहे. त्याबाबत पालिकेने प्रभावी भुमिका घेत संबधित एजंसीचे पेमेंट थांबवा. त्याबाबत पुढील कार्यवाही करा.

अशा सूचना वजा आदेश खासदार उन्मेशदादा पाटील यांनी आज येथे दिल्यात. यावेळी पालिकेचे नगर अभियंता विजय पाटील, भूमी अभिलेख उपअधीक्षक दीपक साळवे, अव्वल कारकून शैलेंद्र राजपुत यांनी अडचणी बाबत माहिती दिली. उपस्थीत नगरसेवकांनी शहरातील विविध भागातील अडचणी मांडल्या. येत्या रविवारी यावर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलवावी. असे खासदार उन्मेश पाटील यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी अरुण चौधरी, महारु चौधरी, संतोष चौधरी या नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या. या बैठकीला भाजपा शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, पालिकेतील गटनेते संजय पाटील, नगरसेवक बापू अहिरे, नगर अभियंता विजय पाटील, अव्वल कारकून शैलेश राजपूत, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, सदानंद चौधरी, हर्षल चौधरी आदि उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com