ज्येष्ठ समाजसेवक बळीरामदादा सोनवणे यांचे निधन

ज्येष्ठ समाजसेवक बळीरामदादा सोनवणे यांचे निधन

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील मूळ रहिवासी बळीराम तोताराम सोनवणे (वय 84) यांचे शुक्रवार, दि. 25 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्यामागे पत्नी, भाऊ, वहिनी, चार मुले, पाच मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. जळगाव राष्ट्रीय काँग्रेसचे जुने कार्यकर्ते व पदाधिकारी, जिल्हापरिषद सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व संचालक, समाज कल्याण सभापती अशी अनेक राजकीय व सामाजिक पदे त्यांनी भूषविलेली होती.

त्यांच्यापश्चात पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या गं.भा.सुमनबाई सोनवणे, भाऊ डॉ.शांताराम सोनवणे व वसंत सोनवणे, पुत्र जिल्हा बँकेचे संचालक व रावेर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना सहसंपर्कप्रमुख मा.आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे, सून चोपड्याच्या आमदार लताबाई सोनवणे, पुत्र नगरसेवक श्यामकांत सोनवणे, सून माजी महापौर राखी सोनवणे, पुत्र नरेश सोनवणे, सून अनिता सोनवणे, पुत्र डॉ.किरण सोनवणे, सून रुपाली सोनवणे, नातवंडे डॉ.गौरव, डॉ.अमृता, डॉ.कोमल, चि.सागर, आर्यन, मानस, शरयू, यामिनी, किंजल असा परिवार आहे.

स्व.बळीरामदादा सोनवणे यांची वैकुंठयात्रा राहते घर जयकिसनवाडी जळगाव येथून दि. 26 रोजी सकाळी 10 वाजता नेरी नाका वैकुंठधामसाठी निघेल. कोरोनाचे संभाव्य अडचणी लक्षात घेता अंत्ययात्रेत पारिवारिक सदस्य सहभागी होतील.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com