पत्नीला दंश केलेल्या सर्पाला पतीने आणले रुग्णालयात

जिल्हा रुग्णालयातील प्रकार : महिलेला शेतात काम करताना सर्पदंश
पत्नीला दंश केलेल्या सर्पाला पतीने आणले रुग्णालयात

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वाघोदा येथे शेतात काम करतांना महिलेला सर्पदंश झाला. यावेळी पत्नीसोबत शेतात काम करणार्‍या पतीने दंश करणार्‍या सर्पाचा शोध घेतला. सर्पाला ठार मारुन रुग्णालयात उपचारासाठी पत्नीसोबत सापालाही घेवून आल्याचा प्रकार शनिवारी, जिल्हा रुग्णालयात घडला. याप्रकाराने डॉक्टरांसह अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. पूजा रुपेश रुले वय 21 रा. वाघोदा ता. रावेर असे संर्पदंश झालेल्या महिलेचे नाव आहे.

वाघोदा येथे शेतात पूजा रुले ह्या पती रुपेश रुले यांच्यासह निंदणीचे काम करत होत्या. यावेळी त्याच्या डाव्या हाताच्या बोटांना सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्याचे कळाल्यावर त्यांनी याबाबत सोबत काम करणार्‍या पती रुपेश रुले यांना माहिती दिली. रुपेश यांनी तत्काळ सापाला पकडून त्या ठार केले. हा साप एका थैलीत सोबत घेवून पत्नी पूजा हिस उपचारासाठी सावदा येथे हलविले. याठिकाणाहून त्यांना पुढील उपचारार्थ जळगाव जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पूजा हिस पती रुपेश याच्यासह नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात आणले. याठिकाणी दंश करणार्‍या सर्पही त्यांना सोबत आणला होता.

हातात सलाईन अन् पायीच निघाले दाम्पत्य

डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करुन पूजा हिस सलाईन लावली. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी रुग्णालयात जागा नसल्याने पुढील उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात जाण्याचा सल्ला पूजा हिचे पती रुपेश रुले यांना दिला सल्ला दिला. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार असुशिक्षित असलेले रुपेश रुले हे एका हातात सलाईन पकडलेली तर पत्नी सोबत अशाच परिस्थितीत पायी निघाले. याठिकाणी काही जणांनी त्यांना पुन्हा रुग्णालयात जायचे सांगितले. तसेच सलाईन संपल्यावर मग डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात जाण्याचा सल्ला. वार्ड पूर्ण रिकामा असतांना डॉ. अहिरे यांनी संबंधितांना डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात का जाण्यास सांगितल्याने डॉक्टरांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com