चंदनाच्या झाडांची कत्तल

पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील घटना
चंदनाच्या झाडांची कत्तल

प्रा.यशवंत पवार

नांद्रा ता.पाचोरा- Nandra Pachora

येथे स्वामी विष्णूदासजी महाराज (Swami Vishnudasji Maharaj) यांच्या श्रीराम आश्रमला (Shriram Ashram) लागून असलेले शेतातील शेतकरी गोकुळ राजाराम पाटील, विनोद बाबुराव बाविस्कर, राजेँद्र महारु पाटील यांच्या शेताच्या बांधावर दि.११ सप्टेंबर रोजी मध्यराञी अज्ञात चोरटे यांनी कटर मशिनच्या साह्याने जवळजवळ १०-१२ वर्षे आयुष्य असलेले मोठे गर्क गाभा असलेला चंदनाचे (Sandalwood) उगवलेले १० ते १२ झाडांची कत्तल करून नेले.

त्यातील अपेक्षित मधला चंदनगाभा शोधून राञीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोरी करुन धूम ठोकली आहे. याअगोदरही विष्णूदासजी महाराज यांच्या श्रीराम आश्रमात घूसून ४ ते ५ वर्षापूर्वी अशाच चंदनाची चोरी करण्यात आली होती तरी याघटनेची माहिती स्वामीजी विष्णूदासजी महाराज यांनी फोन वरून पोलिस पाटील किरण तावडे यांना दिल्यावर प्रथम प्रत्यक्ष शेतकरी सोबत जावून पोलिस पाटील किरण तावडे, पकंज बाविस्कर, पञकार प्रा.यशवंत पवार, संजय जगन बाविस्कर, समाधान राजमल बाविस्कर, लिलाधर बाविस्कर यांनी केली व भविष्यात अशा चोरीच्या घटना पुन्हा घडू नये म्हणून या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्वामी विष्णूदासजी महाज व परिसरातील शेतकरीवर्ग व पशुपालक यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com