फर्दापूर येथील सहा वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू

फर्दापूर येथील सहा वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू

जळगाव । Jalgaon प्रतिनिधी

सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील शाहीद खान अब्दुल रमानखॉन पठाण वय 6 वर्ष या बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना दि.28 ऑगस्ट रोजी घडली. शाहीद खान अब्दुल रहमानखॉन पठाण असे मृत बालकाचे नाव आहे.

रहमानखान पठाण कुटुंबिय हे फर्दापूर येथे शेतात वास्तव्य करतात. ते शेती करुन उदरनिर्वाह भागवितात. शनिवारी दुपारी 2 वाजता रहमान खान यांचा लहान मुलगा शाहीद खान हा शेतात खेळत असतांना त्याच्या पायाला सर्पदंश Snake bite झाला. सर्पदंशामुळे तो रडायला लागला. प्रकार लक्षात आल्यावर रहमान खान यांनी तत्काळ त्यास पहूर येथे उपजिल्हा रुग्णालयात हलविले. याठिकाणी प्राथमिक उपचारानंतर त्यास जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी उपचार सुरु असतांना शाहीद खान याचा मृत्यू झाला. शाहीद याच्या पश्चात आई शबाना, वडिल, बहिण व भाऊ असा परिवार आहे.

दोन जणांना सर्पदंश

शनिवारी जिल्हा रुग्णालयात district hospital सर्पदंशाचे Snake bite आणखी दोन रुग्ण दाखल झाले होते. यात आशा प्रकाश फासले (वय 30 चिंचखेडा. ता जामनेर) व जयश्री मंगल बरकले (वय 32 रा. कुर्‍हे पानाचे ता भुसावळ) या दोन महिलांचा समावेश आहे. दोघाही महिलांना वेगवेगळ्या घटनेत शेतात काम करतांना सर्पदंश झाल्याची माहिती मिळाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com