पारोळा : डाक्टरांच्या घरात सापडलेत ‘तस्कर’ जातीचे सहा सर्प
जळगाव

पारोळा : डाक्टरांच्या घरात सापडलेत ‘तस्कर’ जातीचे सहा सर्प

सर्पमित्रांनी वाचविले प्राण

Rajendra Patil

पारोळा - श.प्र.

येथील कुटीर रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.योगेश सांळूखे यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये ‘तस्कर’ जातीचे पाच ते सहा साप (बिनविषारी) आढळले.

यावेळी सर्पमित्र प्रितम पाठक व भुषण पाटील यांना फोन करून बोलवले असता त्यानी सर्व सर्पांना पकडून जंगलात सोडून देऊन त्यांचे प्राण वाचविले.

यावेळी सर्पमित्र यांनी वसाहत भागातील रहिवाशांना आवाहन केले की, आपल्या घराजवळील स्वच्छता तसेच झाडे झुडपे कटाई करावी व सर्प आढळल्यास त्यास न मारता पारोळा सर्पमित्र -8087064328, 9561954900, 9970701523, 9765922555 या नंबरवर संपर्क करा असे आवाहन केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com