<p><strong>चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी</strong></p><p>चाळीसगाव लगत असलेले नागद(ता.कन्नड) येथील तिघे पादणादेवी येथे कारने दर्शनासाठी जात असताना, त्यांची कार चंडीकावाडी फाट्याजवळ पलटी झाली. यात अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहे. मयताचे नाव भगवान पाटील(४२) रा. नागद असे आहे. तर जखमीची नावे संदीप पाटील, नंदलाल पाटील दोघे,रा.नागद अशी आहेत.</p> .<p>नागद येथील भगवान पाटील, संदीप पाटील, नंदलाल पाटील हे दिघे जण आज पाटणादेवी येथे आपल्या इंडिगो काराने दर्शनासाठी जात असताना, चंडीकावाडी फाट्याजवळ अचानक कारचा ताबा सुटल्याने कार पलटी झाली. यात भगवान पाटील यांना गंभीर मार लागल्याने, त्यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर संदीप पाटील व नंदलाल पाटील हे जखमी झाल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला सायंकालपर्यंत कुठल्याही प्रकारच्या गुन्हांची नोंद नव्हती.</p>