जळगावात साध्या पद्धतीने गणेश विसर्जन

मूर्ती विसर्जन केंद्रावर मोठ्या मंडळासह घरघुती गणपतीचे विसर्जन
जळगावात साध्या पद्धतीने गणेश विसर्जन

जळगाव - प्रतिनिधी Jalgaon

कोरोनामुळे सर्वत्र सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आल्यामुळे यंदा गणपती विसर्जन देखील मंगळवारी जळगावात साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.

यंदा विसर्जन मिरवणुकीवर बंदी असल्यामुळे मेहरून तलावावर विसर्जन करण्यात आले नाही. महापालिकेतर्फे ठिकठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले आहेत.

शहरातील टॉवर चौकसह शहरातील सर्व मुख्य चौकात महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या मूर्ती विसर्जन केंद्रावर मोठ्या मंडळा सह घरघुती गणपतीचे विसर्जन करण्यात आले. शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळख असलेल्या महापालिकेच्या गणपतीची सकाळी विधिवत पूजा अर्चा करण्यात येऊन मूर्ती संकलन केंद्रावर मूर्ती जमा करण्यात आली. दरम्यान गणपती विसर्जन निमित्त शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com