जिल्ह्यात 2, 511 मंडळांकडून होणार श्रींची स्थापना

149 गावांमध्ये एक गाव एक गणपती
जिल्ह्यात 2, 511 मंडळांकडून होणार श्रींची स्थापना

जळगाव । (Jalgaon) प्रतिनिधी

जिल्ह्यात उद्या शुक्रवारी बाप्पाचे आगमन होत आहे. जिल्ह्यात एकूण 2 हजार 511 सार्वजनिक मंडळातर्फे 'श्री' ची स्थापना होणार असून त्यात 149 गावांमध्ये एक गाव एक गणपतीची स्थापना केली जाणार आहे.

गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) पोलीस दल सज्ज झाले असून जवळपास साडे सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त या उत्सवात राहणार आहे, त्याशिवाय सीसीटीव्ही कॅ मेरे व सीआयडीची देखील नजर यावेळी राहणार आहे.

गणेशोत्सव (Ganeshotsav) निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी विविध संवर्गात 6 हजार 695 उपद्रवींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. काही जणांना गणेशोत्सवात (Ganeshotsav) दहा दिवसासाठी जिल्ह्यातून बाहेर काढले जाणार आहे. दरम्यान, गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही कोरोनामुळे यंदाही उत्सव साजरा करण्यावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

या उत्सवात हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे सीआयडीकडून एका डिवायएसपीची जिल्ह्यात नियुक्ती झाली असून एक परिविक्षाधीन आयपीएस अधिकारीही देण्यात आलेला आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पोलिसांचा फौजफाटा जिल्हयात विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी रवाना झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com