जळगाव जिल्ह्यात 2511 मंडळाकडून श्रींची प्रतिष्ठापना

गणेशभक्तांच्या उत्सहाला उधाण
जळगाव जिल्ह्यात 2511 मंडळाकडून श्रींची प्रतिष्ठापना

जळगाव - Jalgaon

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, एक दोन.. तीन चार.. गणपतीचा जयजयकार, मोरया रे बाप्पा मोरया रे.., यासारख्या घोषणांनी मंगलमय वातावरणात बाप्पाचे आगमन झाले.

सलग दुसर्‍या वर्षी देखील कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध असले तरी गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. सर्व नियमांचे पालन करत गणेशभक्तांनी गणरायांची प्रतिष्ठापना केली. (Municipal Corporation) मनपाचा मानाचा समजला जाणार्‍या गणरायाची महापौरांच्या (Mayor) हस्ते पूजन करुन प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

सकाळपासून सांयकाळपर्यंत चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.भक्तांच्या गर्दीने शहरातील बाजारपेठ फुलल्या होत्या.शहरासह जिल्ह्यात २५११ सार्वजनिक मंडळांकडून श्रींची स्थापना करण्यात आली आहे.तसेच १४९ गावांनी एक गाव-एक गणपतीची स्थापना करुन समाजासमोर एक आदर्शवत पायंडा निर्माण केला आहे. (corona) कोरोना संकटाचे विघ्न दूर कर अशी मनोकामना करण्यात आली. दरम्यान,कायदा व सुव्यवस्था अबाधित राहवा यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

महापौरांच्या हस्ते मानाचा गणपतीचे पूजन
जळगाव शहर महानगरपालिकेचा मानाचा गणपती समजला जातो. मनपाच्या प्रांगणात मानाचा गणपतीचे महापौर जयश्री महाजन आणि मनपा विरोधी पक्ष नेते सुनिल महाजन यांच्या हस्ते पूजन करुन दुपारी १२ वाजता प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com