कुपोषित बालकमृत्यूप्रकरणी 7 जणांना शो-कॉज

चौकशी समितीच्या अहवालानंतर सीईओंचा दणका
कुपोषित बालकमृत्यूप्रकरणी 7 जणांना शो-कॉज

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

यावल Yaval तालुक्यातील वड्री गावाजवळील आसाबारी Asabari या आदिवासी पाड्यावर 8 महिन्याचे कुपोषित बालकाच्या Malnourished children मृत्यूप्रकरणी case of death जिल्हा परिषदेचे सीईआेंंनी Zilla Parishad CEOs त्रिस्तरीय चौकशी समिती Committee of Inquiry नियुक्त करुन सात दिवसात अहवाल मागविला होता. त्यात यावल तालुका वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक वैद्यकीय केंद्राचे मेडिकल ऑफिसर, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यासह 7 जणांना शो-कॉज नोटीस Show-cause notice बजावली असून त्यांच्याकडून सात दिवसाच्या आत लेखीखुलासा सादर करण्याचे आदेश जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया ZP Chief Executive Officer Dr. Pankaj Asia शुक्रवारी दिले आहे.

यावल तालुक्यातील वड्री गावाजवळील आसाबारी या आदिवासी पाड्यावर राहणार्‍या एका आदिवासी असलेल्या महिलेचा 8 महिन्याच्या कुपोषित बालकाचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 31 जुलै रोजी उपचरादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून शासकीय यंत्रणा खडबडूून जागी झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी त्रिस्तरीय समिती नियुक्त केली होती.

यात चौकशी समितीप्रमुख जिल्हा महिला व बालकल्याण विकास अधिकरी विजयसिंह परदेशी,पाचोरा गटविकास अधिकारी अतुल पाटील, चोपडा तालुका वैद्यकीय अधिकारी श्री.लासूरकर अशी त्रिस्तरीय समिती नियुक्त केली होती. या चौकशी समितीने 4 ऑगस्ट रोजी आसाबारी या आदिवासी पाड्यावर जाऊन पावरा कुटुंबियांची भेट घेऊन चौकशी केली.

तसेच यावल तालुका वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक वैद्यकीय केंद्राचे मेडिकल ऑफिसर, बाल विकास प्रकल्प अधिकारी, आरोग्यसेविका, आशा सेविका आदींची चौकशी करुन सीईओंना अहवाल सादर केला होता.

त्यावर सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी चौकशी समितीच्या अहवालावरुन यावल तालुका वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक वैद्यकीय केंद्राचे मेडिकल ऑफिसर, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यासह सात जणांवर ठपका ठेवत शो-कॉज नोटीस बजावण्यात आली असून सात दिवसाच्या आत लेखी खुलासा मागविला आहे. त्यानंतर दोषींवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

‘देशदूत’च्या पाठपुराव्यानेे कुपोषणावर प्रकाशझोत

दै.देशदूतने दि.21 जून रोजी जिल्ह्याला कुपोषणाची मगरमिठी आणि दि.9 जुलै 2021 रोजी जिल्ह्यातील अडीच लाख बालकांची होणार तपासणी, दि. ऑगस्ट रोजी कुपोषित बालकाच्या कुटुंबाची चौकशी समितीने घेतली भेट, दि.13 ऑगस्ट रोजी प्रशासनाच्या कुपोषित यंत्रणेमुळे आदिवासी गर्भवती महिलेचा बळी असे वृत्त प्रसिद्ध केले होते.

त्यानंतर नूतन सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील सॅम आणि मॅम असलेल्या बालकांची अंगणवाडी सेविका व तालुकास्तरीय आरोग्य विभागाच्या पथकामार्फत सर्व्हेक्षण करण्याचे आदेश जि.प. महिला व बालविकास अधिकार्‍यांना दिले होते. त्यानंतर 20 ते 25 दिवसानंतर वड्री गावाजवळील आसाबारी आदिवासी पाड्यावर कुपोषित बालकावर वेळीच उपचार न झाल्याने मृत्यूची घटना घडली होती.

या घटनेमुळे जिल्हा प्रशासन हादरला असून त्यांनी चौकशी समितीमार्फत अहवाल मागवून सात जणांना शो-कॉज नोटीस देवून दोषींवर कारवाई करण्याचे सीईओंनी आश्वासित केले आहे.

असा ठेवला ठपका

चौकशी समितीने सात जणांवर ठपका ठेवला असून यात यावल तालुका वैद्यकीय अधिकारी, मेडिकल ऑफीसर, आरोग्यसेविका आदींवर आरोग्य विभागामार्फत लसीकरण न करणे, आरोग्य सुविधा न पुरविणे,ग्रामस्थांत संदर्भ सेवा न देणे, नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे तर अंगणवाडी सेविका, आशा सेविका,बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यावर संदर्भ सेवा न देणे, बालकांचे वजन,लसीकरण न करणे, गरोदर मातांना मार्गदर्शन न करणे, बालकांची उंची व वजन न घेणे आदी कामात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप ठेवला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com