जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

कोविड-19चा संसर्ग प्रादूर्भावाची झळ सर्वात जास्त जळगाव जिल्ह्याला बसली आहे. कोविड प्रादूर्भाव प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात 24हजार 500 नागरीकांसाठी 2450 व्हॉयल लसीची मात्रा जिल्हा आरोग्य प्रशासनास प्राप्त झाली आहे.

आतापर्यत 36हजार 476 नागरीकांची नोंदणी झाली असून 14हजार 109 नागरीक लाभार्थ्यांनी आरोग्य विभागाने सुचित केलेल्या क्रमवारीनुसार केन्द्रावर लसीकरण करून घेतले आहे. या लसीकरणात 22हजार 428 आरोग्य कर्मचारी तर 14हजार 560 फ्रं टलाईन अधिकारी कर्मचारी यांचा समावेश आहे. जिल्ह्यात आदिवासी बहुल असलेल्या चोपडा तालुक्याने मात्र लसीकरणात आघाडी घेतली असून पाचोरा भडगांव आणि मुक्ताईनगर तालुके अद्याप मागे आहेत.

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी 16 जानेवारी 2021 पासून सुरूवातीस 9 तर आजमितीस 19 केन्द्रांवर लसीकरण केले जात आहे. या लसीकरण मोहिमेत सुरूवातीपासूनच चोपडा तालुका आघाडीवर असून तेथे आतापर्यत 1321 नागरीकांनी लसीकरण करून घेतले आहे. या खालोखाल जामनेर, चाळीसगांवसह भुसावळ तालुक्यात लसीकरण झाले आहे. तर सर्वात कमी पाचोरा 568, मुक्ताईनगर 543 तर भडगांव 493 असे आहे. विशेषतः लसीकरण करून घेणे हे स्वेच्छात्मक असले तरी बहुतांश नागरीक लस घेणे टाळण्यावर भर देत असल्याची मानसिकता आहे.

या लसीबाबत अनेक गैसमज ग्रामीण भागात तालुकास्तरवरच नव्हेतर शहरी भागात देखिल आहे. या लसीमुळे ताप येणे, पुरूषांच्या क्षमतेवर परीणाम होतो वा अन्य शेवटच्या टोकाची विचित्र मानसिकता आहे. विशेषतः आरोग्य अधिकारी कर्मचारीच उदासिन आहेत. यात बर्याच ठिकाणी केवळ राजकीय विरोध म्हणून उदासीनता असल्याचे गंभीर बाब चर्चांमधून समोर येत आहे. त्यामुळे या लसीकरणाबाबत जनप्रबोधन करणे गरजेचे आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक पहिल्या टप्प्यातील लसीच्या मात्रेचा डोस घेतल्यानंतर दोन महिन्यात पुन्हा दुसर्यांदा लस घेणे गरजेचे आहे. या लसीकरणामुळे कोणतेही दुष्परीणाम नाहित. ज्याप्रमाणे बीसीजी, गोवर, कांजण्या पोलिओ आदी लसीकरण होते त्याच प्रमाणे कोरोना लस दोन टप्प्यात लस घेणे गरजेचे असल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी सांगीतले.

मृत्यूदर 2.37 वर स्थिर

जिल्ह्यात 18 मार्च रोजी पहिला रूग्ण आढळून आल्यापासून ते डिसेंबर 2020 अखेर 55855 कोरोनाबाधीत रूग्णसंख्या होती. तर 54078 रूग्ण उपचाराअंती बरे झाले. वर्षअखेर 1329 रूग्णांचा मृत्यू नोंद आहे. जानेवारी ते आतापर्यत दिडमहिन्यात 1736 नागरीक कोरोना बाधीत आहेत. तर 1745 रूग्ण उपचाराअंती बरे झाले असून 38 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे. यात बहुतांश मृत्यू हे 50च्या वरील वयोगटातील आहेत. यात सारी कोमरबीड वा अन्य आजाराने मृत्यू झालेले आहेत.