गारखेडा बु. येथे शॉर्टसर्किटने घराला आग, पती-पत्नीचा मृत्यू

गारखेडा बु. येथे शॉर्टसर्किटने घराला आग, पती-पत्नीचा मृत्यू

गारखेडा, ता.जामनेर - Jamner - वार्ताहर :

रात्रीच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे घरात आग लागल्याने पती व पत्नीचा होरपळुन मृत्यू झाला. घटना दि. 11 रोजी रात्री तीन वाजता घडली. जीव वाचविण्याच्या प्रयत्नात दोघे दरवाचाजवळ मृतावस्थेत आढळून आले.

गारखेडा बु येथील रहिवाशी शेतकरी उत्तम श्रावण चौधरी (वय 47) व पत्नी वैशाली उत्तम चौधरी (वय 41) हे दोघ रात्रीचे जेवण झोपी गेले होते. मात्र घरात रात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागून फ्रिजच्या हंडीचा स्फोट होऊन आगीने रुद्र अवतार धारण केल्यामुळे जीव वाचविण्याच्या प्रयत्नात पत्नी वैशाली या दरवाजाजवळ व पती उत्तम हे बाजुला मृत स्थितीत आढळून आले.

तेे झोपलेल्या लाकडी खाट व क्वॉटचे फक्त सापळे घटनास्थळी दिसुन आले. त्यांकडे थोडीशी शेतजमीन असुन उदरनिर्वाहसाठी मातोश्री नर्सरीत मोलमजुरी करुन व मुलगा इलेक्ट्रिक दुकानावर काम करुन ससांराचा गाडा ओढत होते.

मनमिळावू स्वभाव व धार्मिक कुटुंब म्हणुन गावात ओळखले जात होते. त्यांचे स्वतःचे घर पडक्या स्थितीतअसल्यने बाजुच्या घराचा आश्रय घेत एका मुलासह ते राहत होते. घरातील रोख रकमेसह लाखो रुपये किमतीचा घरसामान जळून खाक झाला आहे.

त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगी व अविवाहित मुलगा आहे, या कुटुंबावर आलेल्या घटनेमुळे संपुर्ण गारखेडा परीसरात शोककळा पसरली आहे. घटनास्थळी जामनेर पोलीस स्टेशनचे पी.आय., कान्टेबल, तलाठी, सर्कल, ग्रामसेवक यांनी पंचनामा केला. घटनेचा तपास कान्सटेबल चव्हाण करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com