छुपके,छुपके व्यवसाय करणार्‍यांना दणका

गोलाणीसह फुले मार्केटमधील दुकाने सील; उपायुक्त संतोष वाहुळेंची कारवाई
छुपके,छुपके व्यवसाय करणार्‍यांना दणका

जळगाव - Jalgaon :

शहरासह जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता, अन्य दुकाने बंद आहेत.

करोनाच्या पार्श्‍वभूमिवर अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकानांना बंद ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र शहरातील काही दुकानदार अर्धवट शटर बंद करुन व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे अशा व्यवसायिकांवर कारवाई केली जात आहे.वारंवार सूचना दिल्यानंतरही नियमांचे पालन केले जात नसेलतर यापुढे फौजदारी कारवाई करण्यात येईल.

संतोष वाहुळे, उपायुक्त, जळगाव शहर मनपा

मात्र शहरात गोलाणी मार्केटसह फुले मार्केटमध्ये चोरी,चोरी, छुपके, छुपके व्यवसाय सुरु असल्याचे निदर्शनास आल्याने उपायुक्त संतोष वाहुळे यांनी मंगळवारी चार दुकानांवर सीलची कारवाई करण्यात आली.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्यात ५ ते ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंदचे आदेश आहेत. तसेच दर आठवड्याचा शनिवार आणि रविवार लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनानेदेखील स्थानिक पातळीवर आदेश जारी करुन अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे. मात्र शहरात काही व्यापारी संकुलांमध्ये अर्धे शटर पाडून किंवा शटर खाली करुन व्यवसाय करीत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून नियमांचे उल्लंघन करुन व्यवसाय करणार्‍या व्यापार्‍यांवर कारवाई केली जात आहे.

दरम्यान, मंगळवारी उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह संजय ठाकूर, नाना कोळी, नितीन भालेराव, राहुल पवार, सुनील पवार, किशोर सपकाळे यांच्यासह पथकाने गोलाणी मार्केट आणि फुले मार्केटमध्ये पाहणी केली. या पाहणीअंती गोलाणी मार्केटमधील प्राची मोबाईल, आरएनजी मोबाईल, नेहरु चौकातील टेक्नोवर्ल्ड तर सेंट्रल फुले मार्केटमधील सुभाष क्लॉथ स्टोअर्स्मध्ये शटर पाडून व्यवसाय करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे उपायुक्त वाहुळे यांनी चारही दुकानांवर सीलची कारवाई केली आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्यात ५ ते ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंदचे आदेश आहेत. तसेच दर आठवड्याचा शनिवार आणि रविवार लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनानेदेखील स्थानिक पातळीवर आदेश जारी करुन अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे. मात्र शहरात काही व्यापारी संकुलांमध्ये अर्धे शटर पाडून किंवा शटर खाली करुन व्यवसाय करीत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून नियमांचे उल्लंघन करुन व्यवसाय करणार्‍या व्यापार्‍यांवर कारवाई केली जात आहे.

दरम्यान, मंगळवारी उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह संजय ठाकूर, नाना कोळी, नितीन भालेराव, राहुल पवार, सुनील पवार, किशोर सपकाळे यांच्यासह पथकाने गोलाणी मार्केट आणि फुले मार्केटमध्ये पाहणी केली.

या पाहणीअंती गोलाणी मार्केटमधील प्राची मोबाईल, आरएनजी मोबाईल, नेहरु चौकातील टेक्नोवर्ल्ड तर सेंट्रल फुले मार्केटमधील सुभाष क्लॉथ स्टोअर्स्मध्ये शटर पाडून व्यवसाय करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे उपायुक्त वाहुळे यांनी चारही दुकानांवर सीलची कारवाई केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com