दुकानदारांना करता येणार होम डिलीव्हरी
जळगाव

दुकानदारांना करता येणार होम डिलीव्हरी

सम-विषम तत्वावर मिळाली परवानगी

Rajendra Patil

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील मार्केट उघडण्याबाबत सुरू असलेल्या मागणीसाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत गोलाणी मार्केट, फुले मार्केटमधील व्यापार्‍यांना दररोज 12 ते 4 या वेळेत होम डिलीव्हरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

तर शहरातील सर्व छोट्या व्यापारी संकुलातील दुकानांना सम-विषम तत्वावर सकाळी 9 ते 7 सशर्त परवानगी लवकरात लवकर देण्यात येणार आहे.

या बैठकीला व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांसोबतच राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व इतर उपस्थित होते.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com