लपून-छपून व्यवसाय करणार्‍यांना दणका

१७ दुकानांवर सीलची कारवाई
लपून-छपून व्यवसाय करणार्‍यांना दणका

जळगाव - Jalgaon :

करोनाच्या पार्श्‍वभूमिवर कडक निर्बंध लागू केले आहे. मात्र शहरात लपून-छपून व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आल्याने उपायुक्तांनी व्यावसायिकांना चांगलाच दणका दिला आहे. मंगळवारी तब्बल १७ दुकानांवर मनपा प्रशासनातर्फे सीलची कारवाई करण्यात आली आहे.

शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना नियंत्रणावर उपाय योजनेसाठी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकानांना बंदचे निर्देश आहेत.

जीवनावश्यक वस्तूंची दुकानेदेखील सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत निश्‍चित करुन देण्यात आली आहे. मात्र जळगाव शहरात निर्बंधातही काही व्यावसायिक लपून-छपून व्यवसाय करीत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह संजय ठाकूर, सुनील पवार, किशोर सोनवणे, नाना कोळी, नितीन भालेराव, राहुल कापूरे, सलमान मिस्त्री यांच्यासह मनपाच्या पथकाने सिंधी कॉलनी, बळीरामपेठ, बोहरा गल्ली, फुले मार्केटमध्ये पाहणी केली.

यावेळी लपून-छपून व्यवसाय करणार्‍यांवर कारवाई करण्यात आली असून, तब्बल १७ दुकाने सील केली आहेत. तसेच काही ठिकाणी अतिक्रमण निर्मुलनाच्या पथकाने हॉकर्सवरदेखील कारवाई केली आहे.

यांच्यावर झाली कारवाई

निर्बंधात व्यवसाय करणार्‍यांवर मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी १७ दुकानांना सील करण्याची कारवाई केली आहे.

यामध्ये सिंधी कॉलनीतील सोना महाजन ट्रेडर्स, रेणुकामाता इलेक्ट्रीकल्स्, आदर्श हेअर आर्टस्, रामागिफ्ट नॉव्हेल्टी, संगिता लेडीज कॉर्नर, आशिष कलेक्शन्स्, पवन मोबाईल, गोदडीवाला बुक डेपो, बीएचआर चौकातील सुपर मेन्स पार्लर, विजय मेन्स वेअर, गोपाल ट्रेडर्स, बळीराम पेठेतील जगताप मेटल्स्, रेडिमेड कपड्याचे गोडावून, बोहरा गल्लीतील मकरा केमिकल, मोईस जोहरी, इब्राहिम अँड सन्स्, मुल्ला अली हसीन अली राजकोटवाला या दुकांनाचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com