धक्कादायक : अन् मृत्यूने झोपेतच कवटाळले;अशी आहेत मृतांची नावे

मयत पंधरा जणांना मध्ये तीन बालकांचा समावेश, चालकाला अटक
धक्कादायक :  अन् मृत्यूने  झोपेतच कवटाळले;अशी आहेत मृतांची नावे

यावल - ( अरुण पाटील )

बुऱ्हानपूर अंकलेश्वर रस्त्यावरील किनगाव जवळ पपई भरलेली आयशर ट्रक पलटली होऊन रावेर तालुक्यातील पंधरा मजूर ठार झाले असून त्यांची मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

दिनांक 14 फेब्रुवारी मध्यरात्रीची घटना असून यावल रावेर तालुक्यात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे सविस्तर वृत्त असे की रावेर येथील एम एच एकोणावीस झेड 35 68 आयशर ही धुळे जिल्ह्यातील नेर कुसुंबा येथे पपई भरण्यासाठी मजूर घेऊन दिनांक 14 फेब्रुवारी 20 रोजी नेहमीप्रमाणे पपईच्या बगीच्यामध्ये गेली होती संध्याकाळी पपई भरून मजुरां सह चालक शेख जहीर बद्रुद्दिन मोमिन रावेर हे ट्रक घेऊन रावेर कडे परत येत असताना किनगाव गावाजवळ ट्रकचा गाडीचा उल्ला तू टल्याने ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा गेला व गाडी पलटी झाली.

मजूर वर्ग हा पपई ट्रक मध्ये झोपलेला होता गाडी पलटी झाल्याने पंधरा जण त्यात मृत्युमुखी पडले त्यात एकाच घरातील आभोडा येथील 11 व्यक्तींचा समावेश आहे त्याच 15 वर्षीय आणि तीन वर्षीय बालकाचा समावेश आहे.

मयताची नावे शेख हुसेन शेख मुस्लिम मन्यार वय 30 राहणार फकीर वाडा रावेर ,सरफराज कासम तडवी वय 32 राहणार केऱ्हाळा, नरेंद्र वामन वाघ वय 25 राहणारा आभोळा, दिगंबर माधव सपकाळे व्य55 राहणार रावेर ,दिलदार हुसेन तडवी वय 2० अभोळा, संदीप युवराज भालेराव वय 25 राहणार विवरा, अशोक जगन वाघ वय 40 राहणारा अभोडा, दुर्गाबाई संदीप भालेराव वय 20 राहणार अभोडा, गणेश रमेश मोरे वय पाच वर्षे राहणार आभोडा ,शारदा रमेश मोरे वय 15 वर्षे राहणारा अभोडा, सागर अशोक वाघ व तीन वर्षे राहणारा अभोडा, संगीता अशोक वाघ वय 35 राहणारा अभोडा, सुमनबाई शारीरिक इंगळे वय 45 राहणारा अभोळा , सबनूर हुसेन तडवी वय 53 राहणारा अभोडा हे मयत झाले असून तीन जण जखमी आहेत.

त्यात ड्रायव्हर शेख जहीर बद्रुद्दिन मोमिन रावेर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर या अपघातात आखो देखी बचावलेला रमजान मेहमूद राहणार आभोळा हा बचावला असून याचे वडील सुद्धा तो सव्वा वर्षाचा असताना अपघातात मयत झाले होते आईने लहानपणापासून त्याला लहानाचा मोठा केला तो मात्र सुदैवाने यात बचावलेला आहे तर बाबा इरफान शहा फकीर वाडा वय 19 रावेर याचा पाय मोडला असून याला जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता पाठवण्यात आले आहे.

सदर घटनेचे वृत्त कळताच यावल रावेर तालुक्याचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यावल पंचायत समिती प्रभारी सभापती दीपक अण्णा पाटील भुसावळ नगरीचे माजी नगराध्यक्ष अनिल भाऊ चौधरी डॉक्टर कुंदन फेगडे व घटनास्थळी खऱ्या अर्थाने करीम मणियार यांनी सर्वत्र मेहनत घेतली अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी विभागाचे पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन पोलीस निरीक्षक यावल सुधीर पाटील यांना योग्य ते मार्गदर्शन केले व शवविच्छेदनाचा चे काम सुरू असून ओळख पटल्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com