जळगाव पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेच्या ललिता पाटील बिनविरोध

जळगाव पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेच्या ललिता पाटील बिनविरोध

सर्वसामान्यांपर्यंत विकासाच्या योजना पोहचवा - पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव - Jalgaon

येथील पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) सभापतीपदी शिवसेनेच्या ललिता पाटील (Lalita Patil of Shiv Sena) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे जळगाव गाव पंचायत समितीवर पुन्हा एकदा भगवा फडकला आहे. शासनाच्या विविध विकासाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवा असा सल्ला देत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांनी नवनिर्वाचित सभापतींना शुभेच्छा दिल्या.

जळगाव पंचायत समितीच्या सभापती पदासाठी सव्वा-सव्वा वर्षाचा कार्यकाळ ठरविण्यात आला होता. यानुसार विद्यमान सभापती नंदलाल पाटील यांनी ठरल्यानुसार आपला राजीनामा दिला होता. यामुळे आज सभापती पदाची निवडणूक पिठासन अधिकारी तथा तहसिलदार नामदेव पाटील (Tehsildar Namdev Patil) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ममुराबाद पंचायत समिती गणातून शिवसेनेतर्फे निवडून आलेल्या सौ.ललिता जनार्दन पाटील (कोळी) यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची सभापती म्हणून बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, सहाय्यक गट विकास अधिकारी मंजुश्री गायकवाड विस्तार, अधिकारी एन.डी.ढाके, महेश जाधव आदींनी निवडणूक कामकाजास सहकार्य केले.

यावेळी सभागृहात उपसभापती संगीताताई चिंचोरे, पंचायत समिती सदस्य ज्योतीताई महाजन, जागृतिताई चौधरी, विमलबाई बागुल , शितलताई पाटील, निर्मलाबाई कोळी, यमुनाताई रोटे, नंदलाल पाटील, हर्षल चौधरी आदी उपस्थित होते.

जळगाव पंचायत समितीत एकूण १० सदस्यांपैकी शिवसेनेचे ८ व भाजपचा २ सदस्य आहेत. विशेष म्हणजे १० पैकी तब्बल 8 महिला निवडून आल्याने महिला राज आहे. सव्वा वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर शब्दाला जागून नंदलाल पाटील यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे झालेल्या रिक्त जागी नवीन सभापती पदाची निवडणूक घेण्याचे जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार यांना आदेशीत केले होते.

निवड घोषित झाल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ललिता पाटील यांचा बुके देऊन सत्कार केला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ भंगाळे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, डॉ.कमलाकर पाटील,। शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी सभापती नंदलाल पाटील, तुषार महाजन, भरत बोरसे, रामचंद्रबापू पाटील, जनार्धन पाटील, मच्छीन्द्र पाटील, दिलीप जगताप, परिसरातील सरपंच यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com