रावेर|प्रतिनिधी Raver

कृषी विधेयकाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचे आंदोलन पाकिस्तान आणि चीन च्या पाठींब्याने सुरू असल्याचे मुक्तफळे उधळणाऱ्या केंद्रीय कृषी मंत्री रावसाहेब दानवे यांचा निषेध करण्यासाठी शनिवारी रावेरात प्रतीकात्मक पुतळा जाळण्यासाठी जमलेल्या शिवसैनिकांच्या हातून पोलिसांनी दानवेंचा पुतळा हिसकावून आंदोलन रोखले,यानंतर निवेदन स्वीकारून आंदोलनाची सांगता करण्यात आली.

येथील पीपल्स बँकेजवळून शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद महाजन, तालुकाप्रमुख योगीराज पाटील, युवासेना तालुकाप्रमुख प्रवीण पंडित, शहरप्रमुख नितीन महाजन तालुकासंघटक अशोक शिंदे, मोरगाव येथील बाबुराव पाटील, घनश्याम पाटील,रणगांवचे माजी सरपंच विश्वनाथ कोळी,संतोष महाजन,प्रमोद कोंडे,अनिल पाटील, राकेश घोरपडे,कन्हैया गणानी,शेख लतीफ , शांतीलाल पाटील, उमेश चौधरी ,गोपाल सुतार, प्रदीप पाटील ,किरण महाजन,चंद्रकांत तायडे,बाबुराव कोळी सुरेश शिंदे,ज्ञानेश्वर पाटील, विनोद पाटील यांच्यासह जमलेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी देत,भाजपचे मंत्री दानवेंचा पुतळा आंबेडकर चौकात आणून जाळण्याचा प्रयत्न केला,यावेळी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी आंदोलकाकडून पुतळा हिसकावून घेत जिल्ह्यात ३७(१) कलम लागू असल्याने पुतळा जाळता येणार नसल्याचे बजावत आंदोलन रोखले.

यानंतर नायब तहसीलदार चंदू पवार व पोलीस निरीक्षक वाकोडे यांनी निवेदन स्वीकारले.घटनास्थळी सपोनि शीतलकुमार नाईक,गोपनीय विभागाचे मंदार पाटील,पुरुषोत्तम पाटील,मुकेश वंजारी यांनी चोख बंदोबस्त पाळला.