इथन दरवाढी विरोधात शिवसेनेतर्फे निदर्शने

सर्वसामान्य जनतेचा बजेट कोलमडला
इथन दरवाढी विरोधात शिवसेनेतर्फे निदर्शने

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

पेट्रोल डिझेल व गॅसच्या वाढलेल्या दरांच्या विरोधात चाळीसगाव येथे शिवसेनेतर्फे आज येथील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ घोषणाबाजी करून निदर्शने करीत आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारच्या दरवाढी धोरणांचा निषेध करण्यात आला.

देशात पेट्रोल डिझेल व गॅस चे भाव दिवसेंदिवस वाढत असून याचा सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसत आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. याचा जनतेमध्ये उद्रेक असून ही भाववाढ त्वरित कमी व्हावी, यासाठी आज चाळीसगाव शिवसेनेतर्फे हे आंदोलन करण्यात आले असून यावर त्वरित कारवाई न झाल्यास पुढील आंदोलन तीव्र असेल असा इशाराही आज देण्यात आला आहे.

यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश चव्हाण शहर प्रमुख नाना कुमावत, तालुका संघटक सुनील गायकवाड, भिमराव खलाणे, दिलीप घोरपडे, उप तालुका प्रमुख महिला आघाडी सविता कुमावत, सविता सोनवणे, कोमल जाधव, प्रतिभा सोनार सुनीता पवार, संजय ठाकरे, सचिन ठाकरे, राजेंद्र कुमावत, रामेश्वर चौधरी, अनिल राठोड, मनोज कुमावत, जितेंद्र बोदार्डे, रॉकी धामणे, प्रभाकर ओगले, बापु नवले, राजु भालेराव, ज्ञानेश्वर शिंदे, सचिन ठाकरे, दिलीप पाटील, आधार गायकवाड, अनिल कुडे, विठ्ठल जाधव, संतोष गायकवाड, दिलीप राठोड, गणेश भवर, राजू साळुंके, निलेश गायके, रामेश्वर चौधरी, निलेश गुंजाळ, दिपक गायकवाड, गौतम सोनवणे, छोटु आहीरे, सोनू गायकवाड, नंदु गायकवाड, सुभाष राठोड, राहुल गायकवाड, चेतन कुमावत, जिभा चौधरी, सोमनाथ साळुंखे, शाम भवर, शशी मोरे, दर्शन कापडणे, सोमनाथ गायके, सुनिल महाले, साई सोनवणे, किरण कुमावत आदी शिवसैनिक उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com