गांजाची तस्करी करणारे तिघे अटकेत

साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त ; शिरपूर शहर पोलिसांची कारवाई
गांजाची तस्करी करणारे तिघे अटकेत
चोरी

शिरपूर - Shirpur - प्रतिनिधी :

मुंबई- आग्रा महामार्गावरील शिरपूर टोल नाक्यावर गांजाची तस्करी करणार्‍या तिघांना शिरपूर शहर पोलसांनी सापळा रचून पकडले.

त्यांच्याकडून 51 किलो गांजा, पिकअप वाहन असा एकुण साडेसहा लाखांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघांवर शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरपूर शहराजवळून मुंबई- आग्रा महामार्गावरून काही जण गांजाची अवैध वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती.

त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आज दि. 25 रोजी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास शिरपूर टोल नाक्यावर सापळा रचून एका पिकअप (क्र. एमएच 15 जीव्ही 0244) वाहनाला पकडले. वाहनांची तपासणी केली असता गांजाचा साठा मिळून आला.

त्यामुळे पोलिसांनी दिनकर दत्तु घोडसे (वय 26 रा. मांझरगाव ता. इगतपुरी जि. नाशिक), राहुल विनायक पाटील (वय 24) व विशाल वसंत शेला (वय 25 रा. रा. वासिंद ता. शहापूर जि. ठाणे) या तिघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून 2 लाख 58 हजार 300 रूपये किंमतीचा 51.66 किलो गांजा, 3 लाख 50 हजार रूपये किंमतीचे वाहन व चार मोबाईल असा एकुण 6 लाख 36 हजार 300 रूपयांचा मुद्येमाल जप्त केला.

याप्रकरणी पोकाँ महेंद्र सपकाळ यांच्या फिर्यादीवरून गांजासदृष्य अंमली पदार्थाची बेकायदेशीररित्या वाहतूक करतांना मिळून आल्याने वरील तिघांवर शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक हेमंत पाटील करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com