आमदारांनी राजकरण न करता सोबत काम करावे

माजी आमदार शिरीष चौधरी यांचे आवाहन
आमदारांनी राजकरण न करता सोबत काम करावे
शिरीष चौधरी

अमळनेर

कोरोना महामारीत आमदार अनिल पाटील यांनी गलिच्छ राजकारण न करता माझ्यासोबत खांद्याला खांदा लाऊन काम करावे, असे आवाहन

माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार केले.

माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत घेतली. त्यात ते म्हणाले, कोरोना महामारीत खान्देशातील मृत्यदर वाढला आहे.  लोकांचे प्राण वाचवण्यासाठी मी रेमडेसीवीर उपलब्ध करून देणे महत्वाचे मानले. परंतु आमदारांनी केलेल्या तक्रारीचा मी निषेध करतो. लोकांचे प्राण वाचावेत म्हणून आपण गरजू रुग्णांना 'ना नफा ना तोटा' या तत्वावर रेमडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करून दिले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना भेटून काही कंपनीकडे उपलब्ध असलेला साठा एक्स्पोर्ट करून जनतेला उपलब्ध करून घ्यावा; अशीही मागणी आपण केली आहे. मात्र, यात महाविकास आघाडी राजकारण करीत आहे.

आमच्याकडे रेमडिसिवीरचे परवाने

आमच्याकडे रेमडिसिवीर बाबतचे सर्व परवानेही आहेत. आजही शासनाने परवानगी दिल्यास आपण दहा लाख इंजेक्शन उपलब्ध करून जनतेचे प्राण वाचवू शकतो. विद्यमान आमदार लोकांचे काम आले की एकदा नव्हे दोनदा कोरोना पॉझिटीव्ह होतात. दुसरीकडे त्यांचा दोनच दिवसात खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत फोटो झळकतो. ही जनतेच्या डोळ्यात धूळफेक असून त्यांना लोकांच्या जीवाची काहीही पडलेली नाही. कमिशनमध्ये त्यांचा इंटरेस्ट आहे. त्यांनी हे राजकारण थांबवून खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करावी. त्यांनी तक्रार करण्याऐवजी अमळनेरकारांना इंजेक्शन उपलब्ध करून द्यावेत. आम्ही जनतेच्या सेवेसाठी बांधील असून, कुणाचे प्राण वाचत असतील तर त्यांनी शंभर गुन्हे दाखल केले तरी आम्ही जनतेची सेवा अविरत सुरू ठेवू असे त्यांनी सांगितले. तसेच सर्व परवानगीचे कागदपत्रे आतापर्यंत केलेल्या पुरवठ्याची कागदपत्रे पत्रकारांना दाखवली.

आमदार पाटील यांनी कोरोना काळात मिळालेल्या निधीत भ्रष्टचार करून साहित्यही उपलब्ध नसल्याचा आरोप करून आपल्याकडे या बाबत पुरावे असल्याचे सांगितले मात्र अशा माहामारीच्या काळात जनतेला वाऱ्यावर सोडून रिकामटेकडे धंदे आपणास जमले नाही व करणारही नाही या भ्रष्ट कारभार बाबत योग्यवेळी पूराव्यासह जनतेच्या न्यायलयातच मांडू मात्र आता ती वेळ नाही नागरीकांना आरोग्याच्या पूरेशा सेवा मिळत नाही त्यावर आपले लक्ष असून सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या जनताच ईंगा दाखवेल आम्ही पूरवठा करित असलेले ईंजक्शन हे एक्स्पोर्ट करणे केंद्रांने बंद केल्याने तेच महाराष्ट्राला ऊपलब्ध करून देणार होतो मात्र त्यात राजकारण केले जात असल्याचे त्यांनी सांगीतले

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com