आ.बं.हायस्कूलमध्ये १८ वर्षांपुढील मुले शिक्षण घेतात का?

परछाया वेब सिरीज १८ वर्षांपुढील प्रेक्षकांसाठी, चित्रीकरणाची परवागी हुकूमशाही पद्धतीने?, वेब सिरीचे प्रसारण थांबविण्याची मागणी, विद्यार्थी आई-वडिलाना शाळेत खरच भूत आहे का? विचारु लागले
आ.बं.हायस्कूलमध्ये १८ वर्षांपुढील मुले शिक्षण घेतात का?

मनोहर कांडेकर

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

महाराष्ट्रातील शंभर वर्षांची परंपरा असलेल्या आ.बं.हायस्कूलमध्ये ‘ परछाया ’ या हॉरर वेब सिरीज लघू चित्रपटाचे शृटिंग करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. हा वेब सिरीज असलेला लघू चित्रपट फक्त १८ वर्षांपुढील प्रेक्षकासाठीच पाहणे योग्य असून अंधश्रद्धा निर्मुलनावर यात भाष्य करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. चाळीसगावच्या शैक्षणिक इतिहासात महत्वाची भूमिका बजावणारी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी, या संस्थेच्या बालवाडी पासून तर महाविद्यालयापर्यंत अनेक शाखा आहेत. या चित्रपटासाठी चित्रकरणाची परवागी देतांना १८ वर्षाआतील मुलांचा संस्थेच्या चेअरमनानी विचार केलेला दिसत नसून इतर संचालकांशी सल्ला-मसलत न करता हुकूमशाही पद्धतीने परवागी दिली आहे का?, ज्या संस्थेच्या इमारीतमध्येे हा चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले, त्यात १८ वर्षांपुढील मुले शिक्षण घेतात का? आदि सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

‘ परछाया ’ या हॉरर वेब सिरीज लघू चित्रपटाची क्लिप गेल्या काही दिवसांपूर्वीच समाज माध्यातून व्हायरल झाल्यानतंर, माजी विद्यार्थांंसह काही संचालक या प्रकाराबद्दल प्रचंड संताप व्यक्त करीत आहे. या संबंधीत संस्थेचे सचिव डॉ.विनोद कोतकर यांनी आ.बं.हायस्कूलच्या दोन्ही मुख्याध्यापकांना खुलाशासाठी नोटीस बजावल्या होत्या. त्यापैकी एकाने मी परवागी दिली नाही, तर दुसर्‍याने मला संस्थेच्या चेअरमन यांनी लेखी परवागी दिल्याने मी परवागी दिली, असा खुलासा दिला आहे.

वास्तवीक पाहता चित्रपटाची परवागी देतांना हा विषय संस्थेच्या मॅनेजिंग बोर्डच्या बैठकीत घेणे अपेक्षित होते. परंतू संस्थेच्या संचालकांनी याबाबत संचालकांचे मत विचारात न घेता, हुकूमशाही पद्धतीने हॉरर चित्रपटाच्या चित्रीकरणास परवागी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. संस्थेची इमारात हि काही चेअरमनांची ‘ खाजगी ’ मालकीची नाही, ते इतरांना विचारात न घेता परवागी देतील. संस्थेचा कारभार पाहण्यासाठी संपूर्ण संचालक बोर्डाला सभासदानी निवडुन दिली आहे. परंतू चेअरमन हे गेल्या अनेक वर्षांपासून ‘ हम करे सौ कायदा ’ या अर्विभावात वागत असल्याची चर्चा काही संचालकांमध्ये आहे.

गेल्या काही वर्षांंपासून संस्थेच्या भोंगळ कारभारामुळे संस्थेची पूर्णता; बदनामी झाली आहे. यात शिक्षक भरती पासून ते प्राध्यापक पदाची भरती, पदोन्नतीपासून अनेक विभागात घोळच-घोळच असल्याची चर्चा आहे. तसेच युजीसीकडून बांधकामासाठी आलेल्या निधीत देखील मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची चर्चा शिक्षकांमध्ये दबक्या आवाजात आहे. परंतू चेअरमनाच्या भितीपोटी कोणी उघडपणे बोलण्यास तयार नाही. जे संचालक संस्थेच्या घोळासंदर्भात आवाज उठवतात, त्यांचा काटा निवडणुकीत काढला जातो, आणि त्यांना पदावरुन हद्दपार केले जात असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे संस्थेच्या महाविद्यालयात प्राध्यापक भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम घेण्यात आली असून ती एकानेच आपल्या घरात ठेवल्यामुळे इतर संचालकांमद्ये गेल्या वर्षभरापासून कुचबूच सुुरु आहे. तर याच महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये देखील एका चित्रपटाचे चित्रकरण मागील लॉकडाऊनच्या काळात झाल्याची चर्चा आहे. तो कुठाला चित्रपट होता?, त्याला देखील कोणी परवागी दिली? असे अनेक प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

‘ परछाया ’ चित्रपट १८ वर्षांपुढील प्रेक्षकांसीठीच

आ.बं.हायस्कूलमध्ये चित्रीकरण झालेला ‘ परछाया ’ हा चित्रपट बनविणार हे चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे माजी विद्यार्थी असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.सदर वेब सिरीज चाळीसगाव शहरात चित्रित झाली असून केवळ निवळ मनोरंजन आणि कल्पना शक्तीच्या उद्देशाने हा विषय लोकांसमोर मांडला गेला आहे. त्यात कुठळ्याही प्रकारे अंधश्रद्धेस खतपाणी घातलेले नाही.या सिरीजचे कथानक पूर्णपणे काल्पनिक असून यात चित्रीकरण करण्यात आलेली वास्तू, व्यक्ती याचा थेट कुठल्याही प्रकारे संबंध नाही. तसेच परछाया ही सिरीज १८ वर्षांपूढील प्रेक्षकांसाठीच पाहणे योग्य असल्याचे माहिती प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे. परंतू अं.ब.हायस्कूलमध्ये १८ वर्षांपुढील मुले शिक्षण घेतात. या वेब सिरीज मध्ये अंधश्रद्धा निर्मुलन यावर भाष्य करण्यात आले आहे. आपल्या शाळेत चित्रीत झालेला चित्रपट कुतुहलापोटी १८ वर्षाखालील मुले हा चित्रपट पाहणार नाहीत का?, आणि त्यांनी तो पाहिल्यानतंर त्यातून ते काय अर्थ काढतील व बोध घेतील? याचा सारासार विचार परवागी देतांनाा केला नाही का? संस्थेच्या प्रगतीसाठी व विद्यार्थ्यांच्या हितासाठी संस्थेच्या सभासदानी तुमच्यावर श्रध्दाठेवून निवडून दिले आहे. परंतू चित्रपटास परवागी देतांना सभासद व संचालकांना अंधारात ठेवून परवागी देण्यात आल्याचे आता उघड झाले असून अंधश्रद्धा निर्मुलनच्या नावाखाली चेअमनानी संस्थेत माझा ‘ मनमानी कारभाराची श्रद्धा ’ सर्वांनाच यापुढे देखील ठेवावी लागले असे दाखविण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा संचालकामंध्ये आहे. तर काही तोतय व पाकीट संस्कृती जोपसलेल्या तोतया पत्रकार गेल्या अनेक वर्षांपासून भाऊच्या दावनीला बांधले गेले आहेत, त्यांना हाताशी धरुन संस्थेचा व चेअरमनांच्या मनमानी कारभाराचा गेल्या काही वर्षांपासून वाटेल तसा उदो-उदो केला जात आहे. त्यामुळे संस्थेचा भोेंगळ कारभार चव्हाटावर येत नाही, कारण दिवाळी आणि संस्थेच्या काही प्रकरणांमध्ये अशा अनेकांची ‘ आर्थिक खोळ ’ भरुन आवाज बंद केला जाता असून अनेक चुकीच्या बाबींवर पडदा टाकला जात असल्याची चर्चा आहे.

शालेय शिक्षणासाठी शालेय बेव सिरीची गरज

लॉकडाऊनच्या काळात हॉरर लघू चित्रपटासच्या चित्रकारणासाठी परवागी दिलीच कशी ? असा देखील मुद्दा उपस्तित होत असून संचारबंदीच्या काळात शाळा बंद आहेत. गेल्या दिड वर्षापासून विद्यार्थी शाळेपासून दुरावले आहेत. अशा काळात अध्यापन-अध्यनासाठी एखाद्या शालेय शिक्षणाबाबतच्या बेव सिरीची निर्मिती करणे गरजेचे असताना, हॉरर लघू चित्रपटाचे चित्रकरण झाल्यामुळे अनेक प्रश्‍न उपस्थित होत असून सोशल मिडीयातून टिका होत आहे. तर अं.ब.हायस्कूलमधील अनेक विद्यार्थी आपल्या आई-वडिलाना आमच्या शाळेत खरच भूत आहे का? असा प्रश्‍न विचारु लागले आहेत.

आ.बं.हायस्कूलची इमारत ही पवित्र इमारत आहे. त्या वास्तूत हॉरर चित्रपटाचे चित्रकरण होणे अतिशय खेददायक आहे, परवागी देतांना कुठल्याही संचालकास विश्‍वास घेण्यात आले नसून मुलांच्या मानसिकतेचा विचार केलेला नाही, हुकूमशाही पद्धतीने परवागी दिली आहे. या ठिकाणी १६ वर्षा आतील मुले शिक्षण घेतात, हॉरर चित्रपटामुळे त्यांच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होवू शकतो. त्यामुळे या चित्रपटाचे प्रसारण त्वरित थांबविण्यात यावे. यापुढे सर्व संचलकांना विश्‍वासात घेवूनच चेअरमन यांनी कामकाज करावे, अशी अपेक्षा आहे.

प्रा.बाळासाहेब चव्हाण, अध्यक्ष,चा.एज्यु.सोसायटी

सध्या बर्‍यापैकी मुलांच्या हातात मोबाईल व टॅब आहेत. या वेब सिरीज मुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होईल. मुलांच्या मनात शाळेविषयी भीती निर्माण होईल. त्यामुळे या वेब सिरीजचे प्रचार व प्रसारण पण थांबवावे. अशा प्रकारचे कार्यक्रम देखील मुले पाहणार नाही. याकडे पालकांनी लक्ष केंद्रीत करावे, चमत्कार व मुलांच्या मनात भय दहशत निर्माण करणार्‍या सर्वच कार्यक्रमांवर निर्बंध लावले गेले पाहिजे. शासनाने व शिक्षण विभागाने या सर्व कार्यक्रमकडे विशेष लक्ष केंद्रित केले पाहिजे.

दर्शना पवार, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कार्यकर्ता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com