जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहर महानगरपालिकेत मनपा कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नसून मनपा प्रशासनाकडून यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे.

महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी नुकतेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या काही दिवसात कर्मचार्यांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे.

जळगाव शहर मनपाच्या महापौरपदी विराजमान होताच महापौर जयश्री महाजन यांनी तातडीने कामाला सुरुवात केली आहे.

जळगाव मनपा कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे परंतु अद्यापही त्यांची मागणी मान्य करण्यात आलेली नाही.

महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी याबाबत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे.

महापौरांनी शासनाला पत्र देखील पाठविले असून येत्या काही दिवसात त्यांची मागणी मान्य होणार आहे. मनपा कर्मचार्यांना लवकरच खुशखबर मिळणार आहे.