पारोळा तालुक्यातील बोरी धरणाचे सात दरवाजे उघडले

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पारोळा तालुक्यातील बोरी धरणाचे सात दरवाजे उघडले

पारोळा - Parola प्रतिनिधी

पारोळा तालुक्यातील बोरी मध्यम प्रकल्प (Bori dam) हा शंभर टक्के भरल्याने या धरणाचे सात दरवाजे ०.१५ मिटरने उघडण्यात आले असुन नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पारोळा तालुक्यातील तामसवाडी धरणातील पाणलोट क्षेत्राच्या ठिकाणी दमदार पाऊस सुरू असल्याने बोरी धरणात पाण्याची आवक वाढली असुन आज दिनाक ३१ रोजी सकाळी ११ वाजता या धरणाचे पाच दरवाजे उघडुन नदी पात्रात ३१६० क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली असुन नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

काल सांयकाळ पासुन धरणाच्या पाणलोट क्षेत्रात भरपुर पाऊस पडत असुन पाण्याची आवक वाढली आहे, आज ही पाणी येत आहे म्हणुन धरणाच्या सुरक्षतेच्या दृष्टीने धरणाचे सात दरवाजे ०.१५ मिटरने उघडुन बोरी नदीच्या पात्रात ३१६०क्युसेस पाणी सोडण्यात आले असल्याने आपली जिवित व वित्त हानी टाळण्यासाठी बोरी नदी च्या काठावरिल सर्व गांवाना नागरिंकाना सावधानेचा इशारा तहसीलदार अनिल गवांदे (Tehsildar), पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी प्रशासनाच्या वतीने देऊन धरणावर भेट दिली. सदर माहिती धरण अधिकारी व्ही. एम. पाटील यांनी माहिती प्रशासकिय अधिकार्यां मार्फत देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com